/> प्रत्येकालाच स्वत:मध्ये काही प्लस-मायनस पॉईंट हे सापडतच असतात. काही जणांना वजन कमी करायचे असते. तर काही जणांना सुंदर दिसायचे असते तर काहींना आपली हाईट थोडी जास्त असायला हवी होती असे वाटते. असेच काही वाटत आहे बॉलीवुडचा चॉकलेट बॉय वरुण धवन याला. आता वरुण मध्ये काय कमी आहे की त्याला काहीतरी पाहिजे असा तर त्याच्या चाहत्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल. पण वरुण स्वत:च म्हणतोय ट्राईंग टु लुक टॉलर. वरुणला का बर उंच व्हायचय आणि तो कोणापेक्षा उंच व्हायचा प्रयत्न करतोय असे वाटत असेल ना . तर वरुणला उंच व्हायचय काही मुलींपेक्षा आता या कोण उंच मुली आहेत ज़्यांच्यापेक्षा वरुणला उंच व्हायचय तर त्या आहेत फेमिना मिस इंडियाच्या कंटेस्टंट. या ब्युटिक्वीन जेव्हा स्टेज वर अवतरल्या तेव्हा आपला वरुण बिचारा कमी हाईटमुळे यांच्या गर्दीत हरवुन गेला अन मग काय उंच दिसण्यासाठी चक्क तो या मुलींच्या वर जाऊन उभा राहीला.