या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन वरुनने साकारली टेलरची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:50 IST2018-08-31T15:45:39+5:302018-08-31T15:50:44+5:30
यश राज प्रोडक्शनचा आगामी सिनेमा 'सुई धागा-मेड इन इंडिया' मध्ये वरुण धवनने मौजी नावाच्या टेलरची भूमिका साकारताना दिसणार आहे. वरूणचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

या व्यक्तीकडून प्रेरणा घेऊन वरुनने साकारली टेलरची भूमिका
यश राज प्रोडक्शनचा आगामी सिनेमा 'सुई धागा-मेड इन इंडिया' मध्ये वरुण धवनने मौजी नावाच्या टेलरची भूमिका साकारताना दिसणार आहे. वरूणचा या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी त्यातील साधेपणा आणि प्रामाणिकपणाची प्रशंसा केली. या सिनेमातला कॉश्चुम डिझायनर, दर्शन जालान यांनी वरुणच्या लूकमागचे सिक्रेट सांगितले आणि ते ह्रदयस्पर्शी होते. वरुणला या भूमिकेसाठी टेलरची ट्रेनिंग देणार व्यक्ती नूर वरुन प्रेरणा घेऊन वरुणाचा या सिनेमातला लूक तयार करण्यात आला.
दर्शन म्हणतो, "मौजी हा एक मध्यमवर्गीय असा साधा व्यक्ती आहे जो एक शिलाई मशीनच्या दुकानात मदत करतो. रस्त्यावर काम करणारे लोकांकडूनदेखील आम्ही प्रेरणा घेतली. जसे हरिद्वारच्या रस्त्यांवरून अत्तर विकणारे लोकं आणि खासकरून नूर, नूरने वरूणला शिवणकाम करण्याचे प्रशिक्षण दिले होते. वरुणमध्ये टेलर उभा करताना नूर बारीक-बारीक गोष्टींकडे लक्ष देत होते. सायकल चालवताना पॅण्ट सायकल चेनमध्ये अडकून फटू नये म्हणून पॅण्टच्या बॅटनाला लावलेली एक्स्ट्रा झिप अशा अनेक लहानसहान गोष्टींचा नूर विचार करत होता जेणेकरुन वरुण याभूमिकेला न्याय देऊ शकेल.
वरुण सांगतो, नूर हा सुई धागाचा अविभाज्य घटक आहे. ते 3 महिने माझे प्रक्षिशक होते. त्यांनी मौजी बनण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि मला ट्रेलर बनवले. मला शिवणकाम शिकवल्या बद्दल आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी ऐकले की हा टेलर प्रेक्षकांना आवडला आहे याचे सर्व श्रेय मी दर्शन आणि माझे शिक्षक नूर यांना देतो ज्यांनी माझ्यातला मौजी उभा केला.
या सिनेमात वरुण धवनबरोबर अनुष्का शर्मासुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वरुण आणि अनुष्का पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. सुई धागा 28 सप्टेंबरला गांधी जयंतीपूर्वी रिलीज होणार आहे.