अभिनयानंतर आता वरुण धवनचे 'या' क्षेत्रात पदार्पण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 13:54 IST2018-09-07T13:44:59+5:302018-09-07T13:54:29+5:30
वरुणने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'मैं तेरा हिरो' आणि 'जुडवा2' नंतर पुन्हा एकदा वरुण धवन वडिलांसोबत काम करणार आहे. वरुण तिसऱ्यांदा डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करणार आहे

अभिनयानंतर आता वरुण धवनचे 'या' क्षेत्रात पदार्पण!
वरुणने कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. 'मैं तेरा हिरो' आणि 'जुडवा2' नंतर पुन्हा एकदा वरुण धवन वडिलांसोबत काम करणार आहे. वरुण तिसऱ्यांदा डेव्हिड धवन यांच्यासोबत काम करणार आहे. वरुण धवनाचा मोठा भाऊ आणि वडिलांसोबत वरुण आपले स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस लाँच करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या बॅनरचे प्लॉनिंग प्राथमिक स्तरावर सुरु आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार वरुणचे सिनेमांचे सॅटेलाईट आणि म्युझिकचे राइट्सने चांगला पैसा कमावते आहे. वरुण 2019पर्यंत आपलं प्रॉडक्शन हाऊस लाँच करणार आहे.सध्या वरुण अभिषेक वर्माच्या कलंकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. कलंक' चित्रपटाच्या कथेची कल्पना करण जोहर आणि त्याचे वडील यश जोहरला पंधरा वर्षांपूर्वी सुचली होती. मात्र या चित्रपटाला कित्येक वर्ष मुहूर्त सापडत नव्हता. अखेर आता हा चित्रपट बनत असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आलिया व वरूण यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर व कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. २१ वर्षानंतर माधुरी दीक्षित व संजय दत्तला रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
लवकरच वरुण आणि अनुष्काचा सुई-धागा सिनेमा २८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या वरूणने मौजी आणि अनुष्काने ममताची भूमिका साकारली आहे. ‘सुई धागा: मेड इन इंडिया’ या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करत आहे. आतापर्यंत वरूणने विविध भूमिका केल्या आहेत.