वरूण धवन म्हणतो, मी अजूनही ‘बच्चा’ आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:20 IST2017-09-27T11:49:12+5:302017-09-27T17:20:55+5:30
-रूपाली मुधोळकर सन १९९७ मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘जुडवा’ने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता वरूण धवनचा ‘जुडवा2’ प्रेक्षकांना हसवण्यासाठी ...

वरूण धवन म्हणतो, मी अजूनही ‘बच्चा’ आहे
सन १९९७ मध्ये आलेल्या सलमान खानच्या ‘जुडवा’ने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता वरूण धवनचा ‘जुडवा2’ प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज आहे. येत्या दस-याच्या मुहूर्तावर रिलीज होणाºया या चित्रपटात वरूण धवन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत आहेत, तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस या दोन ग्लॅमरस अभिनेत्री. मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत असलेल्या या ‘जुडवा2’ निमित्ताने वरूण धवनशी मनमोकळ्या गप्पांचा योग आला...या गप्पांचा हा सारांश...
प्रश्न : वरूण, ‘जुडवा2’ प्रेक्षकांच्या ‘मोस्ट अवेटेड’ चित्रपटांच्या यादीत आहे. प्री-बुकींगही जोरात सुरु आहे. काय सांगशील या चित्रपटाबद्दल.
वरूण : प्री-बुकींगला जबरदस्त रिस्पॉन्स आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत हा चित्रपट सर्वाधिक चालावा, असे मला मनापासून वाटतेय. चित्रपटात मी खूप मराठी बोलताना दिसतोय. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना ‘जुडवा2’ जवळचा वाटणार, याबाबत माझ्या मनात काहीही शंका नाही.
प्रश्न : एक वेगळी कथा, वेगळी स्टारकास्ट याशिवाय प्रेक्षकांनी ‘जुडवा2’ कशासाठी पाहावा?
वरूण : आज आपल्या आयुष्यात टेक्नॉलॉजी सर्वाधिक महत्त्वाचा भाग बनली आहे. ‘जुडवा2’मध्ये या टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. लंडनमध्ये झालेले शूटींग, जबरदस्त बाईक स्टंट, स्पेशल इफेक्ट हे सगळे पाहाण्यासारखे आहे. यातल्या एका सायकल स्टंटसाठी आम्ही आम्ही एका प्रोफेशनल सायकलिस्टला हायर केले. हा व असे अनेक सीन्स यात आहेत. यातील अॅक्शन दृश्ये युनिक आहेत. या युनिक अॅक्शनसाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.
प्रश्न : ‘जुडवा2’च्या निमित्ताने सलमान खान आणि तुझी तुलना अटळ आहे. किती दबाव जाणवतोय?
वरूण : (हसत हसत)जितके प्रेशर तुम्ही लोक माझ्यावर टाकताहात, तेवढे तर नक्कीच नाही. माझ्यामते, ही तुलना व्हायलाच नको. कारण तो एक सुपरस्टार आहे आणि मी अजूनही एक बच्चा. मी माझ्यापरीने चित्रपटाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. ‘जुडवा2’ सलमानची कॉपी नसून सलमानला माझा ‘ट्रिब्युट’ आहे.
प्रश्न : ‘जुडवा2’च्या निमित्ताने तुझी अन् गोविंदा यांची एक कॉन्ट्रवर्सी सध्या चर्चेत आहे. काय सांगशील?
वरूण : खरे सांगायचे तर या कॉन्ट्रोवर्सीच्या बातम्या कुठून आल्या मला ठाऊक नाही. कारण मी काहीही बोललेलो नाही किंवा गोविंदाजी पण काहीही बोललेले नाहीत. मी त्यांचा प्रचंड आदर करतो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आहे. फुकटची लोकप्रीयता लाटायच्या नादात ही कॉन्ट्रोवर्सी कुणीतरी जन्मास घातली, इतकेच मी म्हणेल.
प्रश्न : सुपरस्टारची व्याख्या तू कशी करतोस आणि या शर्यतीत तू सध्या कुठे आहेस?
वरूण : ही शर्यत आहे, असे मला वाटत नाही. पण हो, सुपरस्टार बनने सध्या अतिशय कठीण झाले आहे. तुम्ही चांगले काम कराल तर प्रेक्षकांची दाद तुम्हाला मिळणार, हे पक्के आहे. पण माझ्या मते, बदलत्या काळानुसार, सुपरस्टारची व्याख्याही बदलली आहे. सध्या कुणी अभिनेता वा अभिनेत्री नाही तर चित्रपटाची कथा हीच खरी सुपरस्टार आहे,असे मला वाटते.
प्रश्न : वरूण धवनच्या ‘फिमेल पेअर’बद्दल बोलायचे झाल्यास तुझी स्वत:ची आवडती ‘फिमेल मॅच’ कोण?
वरूण : माझ्यासाठी ही निवड नेहमीच चॅलेंजिग आहे. प्रत्येक चित्रपटासोबत बदलणाºया पेअरिंगसोबत मी अधिक चांगले काम करू असा माझा प्रयत्न असतो. मी अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. आलिया, श्रद्धा, जॅकलिन अशा अनेकींसोबत मी काम केले आहे. खरे सांगायचे तर ‘फिमेल मॅच’ शोधण्यापेक्षा मिळेल त्या ‘फिमेल मॅच’सोबत कम्फर्टेबल राहण्याचा मी प्रयत्न करतो.
ALSO READ : OMG!! शेअर केला शर्टलेस फोटो अन् ‘अंडरवीअर’वरून ट्रोल झाला वरूण धवन!
प्रश्न : तुझ्या लग्नाची चर्चा आहे. चाहत्यांना ही खूशखबरी तू कधी देणार?
वरूण : अजून बराच वेळ आहे. ‘जुडवा2’ रिलीज झाल्यानंतर काही प्रोजेक्ट हातात आहे. अर्थात मलाही लग्न करून सेटल व्हायचे आहे. सध्या माझ्या डोक्यात केवळ माझे चित्रपट आहेत. तूर्तास माझे लग्न माझ्या अपकमिंग फिल्मसोबत झालेय, असेही तुम्ही म्हणू शकता.