१८ वर्षांनंतर वरूण धवन भेटला ‘या’ टीचरला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 19:08 IST2017-01-15T19:08:12+5:302017-01-15T19:08:12+5:30

शिक्षकाचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. शिक्षणामुळेच तर आपण इच्छित ध्येय गाठू शकतो. असंच स्थान सेलिब्रिटींच्या आयुष्यातही शिक्षकांना ...

Varun Dhawan meets '18 year' teacher | १८ वर्षांनंतर वरूण धवन भेटला ‘या’ टीचरला...

१८ वर्षांनंतर वरूण धवन भेटला ‘या’ टीचरला...

क्षकाचं आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. शिक्षणामुळेच तर आपण इच्छित ध्येय गाठू शकतो. असंच स्थान सेलिब्रिटींच्या आयुष्यातही शिक्षकांना मिळतं. अलीकडेच अभिनेता वरूण धवन हा तब्बल १८ वर्षांनंतर त्याच्या अ‍ॅक्टिंग स्कूलच्या टीचरला भेटल्याचे कळतेय. आता तो कसा, कुठे, केव्हा भेटला? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तो नुकताच उत्तराखंड येथून आलेल्या मुलांना भेटण्यासाठी जुहू येथील एका शाळेत गेला असता त्याच्यासमोर अचानक त्याच्या टीचर संजना कपूर आल्या. त्या सध्या एनजीओसाठी काम करत असून, त्यांना भेटून त्याला प्रचंड आनंद झाला. 

त्यांच्याविषयी अधिक माहिती देताना तो म्हणाला,‘मी लहानपणी पृथ्वी थिएटरमध्ये अ‍ॅक्टिंगचे क्लासेस जॉईन केले होते. दोन महिन्यांपर्यंत संजना यांनी मला ट्रेनिंग दिली. वरुणला सिंड्रेलाची भूमिका दिली. महिला भूमिका साकारण्याची क्षमता माझ्यात आहे असे त्यांनी सांगितले होते. ‘ वरूण धवनने मग संजना कपूर यांना त्यांच्या फॅमिलीसह त्याने डिनरसाठी बोलावले. त्यांच्यासोबत घालवलेले ते सुवर्णक्षण पुन्हा एकदा यानिमित्ताने साठवण्याचा त्याने प्रयत्न केला.’ 

दिग्दर्शक शशांक खैतान यांचा रोमँटिक चित्रपट ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’चे  शूटिंग अलीकडेच संपले. आता तो डेव्हीड धवन दिग्दर्शित ‘जुडवा २’ साठी तयारी करतो आहे. यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू या दिसतील. एप्रिल महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याची शक्यता आहे. 

                                                            

Web Title: Varun Dhawan meets '18 year' teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.