वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नूने पूर्ण केली 'जुडवा 2' ची शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 15:33 IST2017-07-29T06:41:56+5:302017-07-31T15:33:57+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या 'जुडवा' चा सीक्वल  'जुडवा 2' तयार करण्यात येतो आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने ...

Varun Dhawan, Jacqueline Fernandes, Tapi Pannu complete 'Juhuwa 2' shoot | वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नूने पूर्ण केली 'जुडवा 2' ची शूटिंग

वरुण धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नूने पूर्ण केली 'जुडवा 2' ची शूटिंग

लिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या 'जुडवा' चा सीक्वल  'जुडवा 2' तयार करण्यात येतो आहे. या चित्रपटाची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने बघतायेत. जुडवाच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबर आहे. 'जुडवा 2' च्या टीमने आपल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. वरुण धवनने आपल्या इन्स्टाग्रामवर 'जुडवा 2' च्या टीमसोबतचा ग्रुप फोटो शेअर केला आहे. मॉरीशयसमध्ये त्यांनी शूटिंग पूर्ण केले आहे. या फोटोत वरुणसोबत बाबा डेव्हिड धवन, जॅकलिन फर्नांडिस, तापसी पन्नू ही दिसतायेत.  



वरुणने वेळोवेळी आपल्या फॅन्ससोबत 'जुडवा 2' संदर्भातल्या अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांने सलमान खान सोबत चित्रपटाच्या टीमचा फोटो पोस्ट केला होता. जेव्हा सलमान खानने या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली होती. सलमानचा यात कॅमिओ आहे. सलमानसोबत शेअर केलेल्या फोटोला वरुणने एक कॅप्शन दिले होते. ज्यात त्यांने लिहिले होते, आज मी माझ्या बालपणीच्या सुपरहिरो सलमान खानसोबत शूटिंग केले. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान लंडनमध्ये जॅकलिन आणि तापसीमध्ये कॉल्ड वॉर बघायला मिळाले होते. त्यामुळे दोघींनी आपले सीन्स वेगळे वेगळे शूट केले होते.

ALSO READ : जाणून घ्या वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत केव्हा करणार लग्न?

या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुणचे बाब डेव्हिड धवन करतायेत. तर या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करते आहे. तब्बल 20 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वल येतो आहे. वरुण धवनची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. याआधी वरुणने वडिलांसोबत 'मै तेरा हिरो' चित्रपटात काम केले आहे. 'जुडवा 2' 29 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 

Web Title: Varun Dhawan, Jacqueline Fernandes, Tapi Pannu complete 'Juhuwa 2' shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.