रक्षाबंधन निमित्त वरूण धवन त्याच्या बहिणींना देणार ही भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 19:00 IST2018-08-25T16:11:09+5:302018-08-25T19:00:00+5:30
अभिनेता वरूण धवन दरवर्षी आपल्या बहिणी आणि चुलत भावडांसोबत रक्षाबंधन सण साजरा करतो. मात्र यावर्षी वरूण काहीतरी वेगळा करणार आहे.

रक्षाबंधन निमित्त वरूण धवन त्याच्या बहिणींना देणार ही भेटवस्तू
अभिनेता वरूण धवन दरवर्षी आपल्या बहिणी आणि चुलत भावडांसोबत रक्षाबंधन सण साजरा करतो. मात्र यावर्षी वरूण काहीतरी वेगळा करणार आहे. त्याचा आगामी 'सुई धागा-मेड इन इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो टेलरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला भारतीय कारागिरांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या शिल्पवस्तू आणि कपड्यामध्ये अधिक रूची निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या रक्षाबंधनासाठी वरूणने विशेष हस्तनिर्मित भेटवस्तू तयार केल्या आहेत. ज्या भारतीय कापड आणि शिल्पापासून बनविण्यात आल्या आहेत. या भेटवस्तू वरूण त्याच्या बहिणींना भेट म्हणून देणार आहे.
वरूण म्हणतो की, 'दरवर्षी मी काहीतरी वेगळी भेट बहिणांना देण्याचा प्रयत्न करतो, अशी भेट की ती त्यांना आवडेल. भारतीय कला आणि शिल्प यांची सुंदरता अनन्य आहे. सुई-धागा या चित्रपटांदरम्यान मी भारतीय कला आणि शिल्प याबाबतीत खूप काही शिकलो. त्यामुळेच मी बहिणींना हस्तनिर्मित भेटवस्तू देणार आहे.'
पुढे तो म्हणाला की, 'मी माझ्या बहिणींना साडी,स्कार्फ, स्टोल आणि हस्तनिर्मित डायरी अशा भेटवस्तू देणार आहेत. या वस्तूंवर फुलकारी कला, तुसर रेशीम, कंठा आणि एल्पिक काम केलेले आहे. मला आशा आहे की, माझ्या बहिणींना या भेटवस्तू नक्कीच आवडतील, जेवढे मला या भेटवस्तू निवडताना आली.'
वरूण धवनचा आगामी चित्रपट 'सुई-धागा'च्या प्रदर्शनाची वाट त्याचे चाहते आतुरतेने पाहत आहेत. या चित्रपटात तो एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.