सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन गंभीर जखमी, फोटो शेअर करत म्हणाला, "लोखंडाच्या खांबाला आपटल्यानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 11:04 IST2023-12-18T11:04:17+5:302023-12-18T11:04:54+5:30

'वीडी १८' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुणला गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्वत:च याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

varun dhawan gets injured while VD 18 movie shooting shared photo of swollen leg | सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन गंभीर जखमी, फोटो शेअर करत म्हणाला, "लोखंडाच्या खांबाला आपटल्यानंतर..."

सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवन गंभीर जखमी, फोटो शेअर करत म्हणाला, "लोखंडाच्या खांबाला आपटल्यानंतर..."

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. वरुण 'वीडी १८' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'वीडी १८' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वरुणला गंभीर दुखापत झाली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्वत:च याची माहिती चाहत्यांना दिली आहे. 

वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वरुणचा पाय सुजलेला दिसत आहे. शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे वरुणच्या पायाला सूज आली आहे. "लोखंडाच्या खांबाला आपटल्यामुळे पायाची नस सुजली...", असं वरुणने पोस्टमध्ये म्हटलं आहे. वरुणच्या या स्टोरीमुळे त्याच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे. 

दरम्यान, 'वीडी १८' सिनेमात वरुण धवनबरोबर कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपटाचे दिग्दर्शन तमिळ दिग्दर्शक कलीस करत आहेत. २०२४मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या बवाल सिनेमात वरुण धवन दिसला होता. 

Web Title: varun dhawan gets injured while VD 18 movie shooting shared photo of swollen leg