वरूण धवन ठरला REAL HERO! जखमी डान्सरला अशी केली मदत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:00 IST2019-05-17T14:00:28+5:302019-05-17T14:00:48+5:30
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन एक उत्तम अभिनेता आहे, सोबतच एक उत्तम डान्सरही. पण खरे सांगायचे तर वरूण एक उत्तम अभिनेता व डान्सरसोबत एक उत्तम व्यक्तिही आहे. त्याची अॅक्टिंग आणि डान्सिंग स्किल तुम्ही पाहिलीच. आता तो किती चांगली व्यक्ती आहे, हेही तुम्हाला कळेल.

वरूण धवन ठरला REAL HERO! जखमी डान्सरला अशी केली मदत!!
ठळक मुद्देवरूणच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या वरूणन ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात बिझी आहे.
बॉलिवूड अभिनेता वरूण धवन एक उत्तम अभिनेता आहे, सोबतच एक उत्तम डान्सरही. पण खरे सांगायचे तर वरूण एक उत्तम अभिनेता व डान्सरसोबत एक उत्तम व्यक्तिही आहे. त्याची अॅक्टिंग आणि डान्सिंग स्किल तुम्ही पाहिलीच. आता तो किती चांगली व्यक्ती आहे, हेही तुम्हाला कळेल.
होय, अलीकडे सोशल मीडियावर एका अपघातात जखमी झालेल्या हिप-हॉप डान्सरचा फोटो वेगाने व्हायरल झाला. संबंधित जखमी डान्सरच्या मित्रांनी या फोटोसोबत मदतीचे आवाहन केले होते. वरूणची नजर या फोटोवर गेली आणि त्याने लगेच या जखमी डान्सरच्या उपचारासाठी ५ लाखांची मदत देऊ केली.
जखमी डान्सरचे नाव ईशान आहे. डबल फ्लिप करताना ईशानचे संतुलन बिघडले आणि तो खाली कोसळला. या अपघातात ईशानच्या मानेला गंभीर दुखापत झाली. घरची आर्थिक परिस्थिती स्थिर नसल्यामुळे ईशानवर उपचार करणे अशक्य होते. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी अनेक जण पुढे आले आहेत. ईशानला मदत व्हावी यासाठी डान्सर कार्तिक राजा यानेदेखील ईशानचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मदतीचे आवाहन केले होते. ईशानचा फोटो पाहिल्यानंतर वरुणने कार्तिकजवळ या मुलाची चौकशी केली. त्यानंतर लगेच ईशानच्या उपचारासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. डान्सर कार्तिक राजाच्या माध्यमातून ईशानपर्यंत ही मदत पोहोचेल, अशी व्यवस्था त्याने केली. यादरम्यानचे कार्तिक व वरूणच्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहेत.
वरूणच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या वरूणन ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटात बिझी आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित या चित्रपटात वरूणच्या अपोझिट श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये आहे. पंजाब, लंडन व दुबईत या चित्रपटाचे शूटींग होणार असून, याचवर्षात नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. अलीकडे वरूणचा ‘कलंक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या मल्टिस्टारर सिनेमाकडून वरूणला कमालीच्या अपेक्षा होत्या. पण प्रेक्षकांनी या चित्रपटाला नाकारले आणि ‘कलंक’ बॉक्सआॅफिसवर अपेक्षित कमाई करण्यास अपयशी ठरला.