वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:03 IST2023-07-19T17:34:37+5:302023-07-19T18:03:24+5:30

जान्हवी कपूरबरोबर केलेल्या 'त्या' कृत्यामुळे वरुण धवन ट्रोल

varun dhawan byte janhavi kapoor ear photo goes viral netizens trolled | वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप

वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेतला अन्...; अभिनेत्याचं कृत्य पाहून नेटकऱ्यांचा संताप

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर त्यांच्या आगामी 'बवाल' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. सध्या जान्हवी आणि वरुण 'बवाल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यादरम्यानचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत वरुण धवनने जान्हवीबरोबर केलेलं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

'बवाल' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा एक फोटो बॉली बिनधास्त अँड गॉसिप या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये वरुण धवन जान्हवी कपूरच्या कानाचा चावा घेताना दिसत आहे. वरुण धवन आणि जान्हवीचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी वरुण धवनला ट्रोल केलं आहे. 

मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा

Umm whattt
by u/Worth_Put7897 in BollyBlindsNGossip

एकाने कमेंट करत "हा मला छपरी वाइब्स देत आहे," म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "वरुणचं लग्न झालंय म्हणून त्याने असं केलं नाही पाहिजे, असं लोक म्हणत आहेत. पण, त्याने हे कृत्य करणंच चुकीचं आहे. त्याचं लग्न झालं असू दे किंवा तो सिंगल असू दे," अशी कमेंट केली आहे. "जान्हवीने त्याच्या कानाखाली मारायला हवी होती," असं म्हणत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

दरम्यान, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' चित्रपट येत्या २१ जुलैला सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता असून सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 
 

Web Title: varun dhawan byte janhavi kapoor ear photo goes viral netizens trolled