वरुण धवनच्या कुटुंबातील या सदस्याचे झाले निधन, बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 15:06 IST2020-05-25T14:58:35+5:302020-05-25T15:06:03+5:30
वरुणने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिली

वरुण धवनच्या कुटुंबातील या सदस्याचे झाले निधन, बॉलिवूडने वाहिली श्रद्धांजली
लॉकडाऊनमध्ये अभिनेता वरुण धवनच्या मावशीचे निधन झाले आहे. वरुणने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती दिली. मावशी सोबतचा फोटो शेअर करत त्याने श्रद्धांजली वाहिली. या फोटोत वरुण आणि त्याची मावशी दोघेही हसताना दिसतायेत. लव्ह यू मावशी, ईश्वर तुझ्या आत्माला शांती देओ..यासोबतच वरुणने गायत्री मंत्र देखील लिहिला आहे. वरुणच्या या पोस्टवर सोनम कपूर, मलायका अरोरा, जोया अख्तर तसेच रेमो डिसुझाने कमेंट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर वरुण सारा अली खानसोबत 'कुली नंबर 1' मध्ये दिसणार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच विनोदी कलाकार परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.
माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक ते सुपरस्टार अभिनेता हा वरूणचा प्रवास थक्क करणारा आहे. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली. एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देत, ए लिस्ट स्टार्समध्ये स्वत:चे नाव नोंदवले.