​वरूण धवनवर नाराज तर नाही गर्लफ्रेन्ड नताशा दलाल? बी-टाऊनमध्ये चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 14:20 IST2017-10-25T08:50:57+5:302017-10-25T14:20:57+5:30

नुकताच वरूण धवन ‘नो फिल्टर नेहा’ या नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये गेला होता. याठिकाणी त्याने गर्लफ्रेंड नताशा दलालबद्दल मनमोकळ्या ...

Varun Dhawan angry, if not a girlfriend, Natasha Dalal? Discuss discussion in B-Town | ​वरूण धवनवर नाराज तर नाही गर्लफ्रेन्ड नताशा दलाल? बी-टाऊनमध्ये चर्चेला उधाण

​वरूण धवनवर नाराज तर नाही गर्लफ्रेन्ड नताशा दलाल? बी-टाऊनमध्ये चर्चेला उधाण

कताच वरूण धवन ‘नो फिल्टर नेहा’ या नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये गेला होता. याठिकाणी त्याने गर्लफ्रेंड नताशा दलालबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. नताशाबद्दल विचारल्यावर वरुणने एक सुंदर स्माइल देत नेहाच्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. ‘ हो, मी हे मान्य करतो की, मी नताशाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र हे मी कधीच कुणाला सांगत नाही. कारण मला नताशाला इंडस्ट्री आणि मीडियापासून दूर ठेवायचे आहे. मी तिच्याविषयी फार बोलत नाही, कारण मीडियामध्ये कुठल्या गोष्टीचा कसा अर्थ काढला जाईल हे सांगणे कठीण आहे. माझ्या खासगी आयुष्यात मला कुणाचाही हस्तक्षेप नकोय. कारण मी खूपच सेंटी आहे.  माझे काम पूर्ण करून मी घरी पोहोचतो तेव्हा मी रिअल लाइफ जगतो,’ असे वरूण यावेळी म्हणाला होता.  नताशाबद्दल असे भरभरून बोलणा-या याच वरूणच्या खासगी आयुष्यात सध्या  फार काही ‘आॅल वेल’ नाहीय.

होय, ताजी चर्चा खरी मानाल तर वरूण व नताशात काहीतरी बिनसले आहे. होय, कारण असे नसते तर अलीकडे दिवाळी पाटर्यांमध्ये वरूण एकटा दिसला नसता. आधी वरूण व नताशा सर्रास एकत्र दिसत. अलीकडच्या बहुतेक सर्वच पार्ट्यांना दोघे एकत्र जात.  दिवाळीच्या दिवसांत वरूणने अनेकांच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. पण या पार्टीमध्ये नताशा त्याच्यासोबत नव्हती. नताशा व वरूण ‘जुडवा2’च्या स्क्रीनिंगला एकत्र दिसले होते. दिवाळीही हे कपल एकत्र साजरे करणार, असा कयास होता. पण तसे कुठेच दिसले नाही. मध्यंतरी वरूण आणि त्याची ‘जुडवा2’ को-स्टार तापसी पन्नू या दोघांची जवळीक वाढल्याची बातमी होती. नताशा यामुळे अपसेट असल्याचेही ऐकीवात आले होते. खरे तर वरूणचे नाव पहिल्यांदा कुठल्या को-स्टारसोबत जोडले गेलेल नाही. याआधीही आलिया भट्ट, नर्गिस फखरीसोबत त्याचे नाव जुळले होते. पण कदाचित नताशाला याची सवय होण्यापेक्षा याचा त्रास होऊ लागला आहे. दिवाळीत नताशा वरूणपासून दूर आहे, याचे हेच तर कारण नसावे? आता खरे काय ते तर नताशा व वरूणलाच ठाऊक़

Web Title: Varun Dhawan angry, if not a girlfriend, Natasha Dalal? Discuss discussion in B-Town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.