लग्न आधीच सुनेच्या 'या' मागणीला दिला वरुण धनवच्या आई-वडिलांनी नकार, वाचा काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 17:17 IST2019-03-14T17:12:56+5:302019-03-14T17:17:53+5:30
वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा 'कलंक'मध्ये बिझी आहे. यावर्षाच्या अखेरीस वरुण कथित गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.

लग्न आधीच सुनेच्या 'या' मागणीला दिला वरुण धनवच्या आई-वडिलांनी नकार, वाचा काय आहे प्रकरण
वरुण धवन सध्या त्याचा आगामी सिनेमा 'कलंक'मध्ये बिझी आहे. यावर्षाच्या अखेरीस वरुण कथित गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. वरुणला सुद्धा रणवीर सिंग-दीपिका पादुकोण सारखे डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे. मात्र वरुणचे आई-वडील या गोष्टीसाठी तयार नसल्याची माहितीसमोर येते, त्यामुळे नताशा वाईट वाटू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड धवन आणि लाली यांचे म्हणणे आहे त्यांच्या मुलांने देशाबाहेर लग्न करु नये. लग्नात जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने सहभागी व्हावे. विदेशात जाऊन लग्न करण काही सोपी गोष्ट नाहीय असे त्यांचे म्हणणे आहे. नताशाला मालदिवमध्ये जाऊन डेस्टिनेशन वेडिंग करायचे आहे. त्यामुळे नताशाची काहीशी निराश होऊ शकते.
वरुण कडून अजून याबाबत कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही मात्र लवकरच तो आपल्या लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअऱ करण्याची शक्यता आहे. नताशा ही वरुणची बालपणीची मैत्रिण आहे. वरूण व नताशा अनेकदा एकत्र दिसले आहेत. वरुणच्या घरच्या सगळ्या इव्हेंटला नताशा व तिचे कुटुंब हजर असते. मात्र दोघांनी आपलं नातं कधीच स्वीकारले नव्हते.
वरुणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर तो 'कलंक'मध्ये तो आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर , सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितबरोबर दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. अभिषेक वर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे.