‘जुडवा-२’ अगोदर लिक झाला वरुण धवन अन् जॅकलीन फर्नांडिसचा ‘वाइल्ड किस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 21:25 IST2017-07-08T15:54:46+5:302017-07-08T21:25:07+5:30
अभिनेता वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस त्यांच्या आगामी ‘जुडवा-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

‘जुडवा-२’ अगोदर लिक झाला वरुण धवन अन् जॅकलीन फर्नांडिसचा ‘वाइल्ड किस’
अ िनेता वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस त्यांच्या आगामी ‘जुडवा-२’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांच्या या प्रोजेक्टमध्ये त्यांचाच मुलगा वरुण मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वरुण, जॅकलीन व्यतिरिक्त अभिनेत्री तापसी पन्नूदेखील चित्रपटात प्रमुख भूमिकेत बघावयास मिळेल. मात्र सध्या वरुण आणि जॅकलीनमधील केमिस्ट्रीच अधिक चर्चेत राहत असून, सध्या दोघांच्या ‘वाइल्ड किस’ व्हिडीओने धूम उडवून दिली आहे.
वास्तविक वरुण आणि जॅकलीनचे सध्या दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे याच्यात एक गोष्ट खूपच स्पेशल आहे. व्हिडीओमध्ये वरुण आणि जॅकलीन बिनधास्तपणे किस करताना दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला हे दोघे ज्या पद्धतीने एकमेकांना किस करीत आहेत, त्यावरून सोशल मीडियावर सध्या वादंग निर्माण झाले आहे. शिवाय त्यांचा हा ‘किस’ व्हिडीओ वाºयासारखा व्हायरलही केला जात आहे.
दरम्यान, १९९७ मध्ये आलेल्या ‘जुडवा’ या चित्रपटाचा हा सीक्वल असून, त्यामध्ये वरुण सलमानची जागा घेताना दिसणार आहे. कारण ‘जुडवा’मध्ये सलमानने डबल रोल साकारला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. त्यावेळी डेविड धवन यांनीच ‘जुडवा’चे दिग्दर्शन केले होते. आता २० वर्षांनंतर पुन्हा एकदा ते ‘जुडवा-२’ घेऊन येत आहेत. मात्र चित्रपट रिलीज अगोदरच हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर २०१७ रोजी रिलीज होणार आहे.

}}}} ">Not sure if Varun - Jacqueline are kissing or eating each other's face . pic.twitter.com/h30J7OL6mM— SRK's WARRIOR (@SRKsWarrior1__) July 4, 2017वास्तविक त्यांचा हा व्हिडीओ शूटिंग करतानाचा आहे. लंडन येथे चित्रपटातील किस सीन शूट करतानाचा एक प्रसंग चित्रित केला जात होता. परंतु कोणीतरी एका उंच बिल्डिंगमधून त्यांचा हा सीन शूट केल्याने त्याला सध्या वेगळेच वळण दिले जात आहे. व्हिडीओ बघून असे वाटत आहे की, वरुण आणि जॅकलीन बिनधास्तपणे एकमेकांना किस करीत आहेत. शिवाय हा शूटिंगचा भाग नसावाच असे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओकडे वेगळ्याच नजरेने बघितले जात आहे.
Not sure if Varun - Jacqueline are kissing or eating each other's face . pic.twitter.com/h30J7OL6mM— SRK's WARRIOR (@SRKsWarrior1__) July 4, 2017