चटके देणा-या उन्हात वरुण आणि अनुष्काने या सिनेमासाठी दिवसातून दहा तास केली सायकलस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 13:10 IST2018-03-06T07:36:52+5:302018-03-06T13:10:53+5:30

अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत.पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके ...

Varun and Ashoka took 10 hours a day for the film | चटके देणा-या उन्हात वरुण आणि अनुष्काने या सिनेमासाठी दिवसातून दहा तास केली सायकलस्वारी

चटके देणा-या उन्हात वरुण आणि अनुष्काने या सिनेमासाठी दिवसातून दहा तास केली सायकलस्वारी

िनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत.पहिल्यांदाच ऑनस्क्रीन एकत्र येणा-या वरुण आणि अनुष्काचा हटके लूक रसिकांना पाहता येणार आहे.'सुई धागा' या सिनेमातून हे दोघंही आजवर कधीही पाहिलं नाही अशा अनोख्या अंदाजात रुपेरी पडद्यावर झळणार आहेत.या सिनेमात वरुण धवन टेलरच्या भूमिकेत झळकणार असून 'मौजी' असं त्याच्या व्यक्तीरेखेचे नाव असेल.दुसरीकडे अनुष्का कपड्यांवर नक्षीकाम (एम्ब्रॉयडरी) करणा-या ममताच्या भूमिकेत झळकणार आहे.'मेड इन इंडिया' अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमाची कथा मध्य प्रदेशात रंगणार आहे. या ठिकाणी बहुतांशी नागरिक येण्या जाण्यासाठी सायकलचा वापर करतात. त्यामुळे सुई धागा सिनेमात वरुण-अनुष्का सायकलवर फिरताना पाहायला मिळणार आहेत.सध्या उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झालीय.मध्य प्रदेशमध्ये तर सूर्यनारायण आग ओकत असतो.अशा चटके देणा-या उन्हात वरुण आणि अनुष्काने या सिनेमासाठी दिवसातून दहा तास सायकल चालवली आहे.हा अनुभव वरुण आणि अनुष्कासाठी थकवा आणणारा असाच होता.या सिनेमातील कथेला न्याय मिळावा यासाठी निर्माता दिग्दर्शक प्रत्येक लहानसहान गोष्टीची खबरदारी घेत आहे.कलाकारांचे कपडे,वेशभूषापासून सगळ्या गोष्टी रिअल वाटाव्यात आणि सिनेमाची कथा रसिकांच्या काळजात घर करुन जावी यासाठी कोणतीच कसर सोडली जात नसल्याचं पाहायला मिळत आहे.शरत कटारिया 'सुई धागा' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून मनीष शर्मा सिनेमाचे निर्माते आहेत.यशराज बॅनरचा हा सिनेमा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.मात्र वरुण आणि अनुष्काचा हटके लूक तसंच सायकलस्वारीमुळे सिनेमाची आतापासूनच 'सुई धागा' सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

या सिनेमाचा  फर्स्ट लूक खुद्द वरूण धवनचे सोसल मीडियावर शेअर केला होता.त्यात दोघांचाही देसी अंदाज पाहायला मिळाला.वरूण व अनुष्काच्या या लूकने रसिकांची अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे.वरूण धवन आणि अनुष्का शर्मा हे दोघे पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत.आता या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना किती भावते ते पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.‘सुई धागा’शिवाय अनुष्काचा ‘परी’ हा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे.अनुष्काची निर्मिती असलेला ‘परी’ एक हॉरर चित्रपट आहे.



 

Web Title: Varun and Ashoka took 10 hours a day for the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.