उर्वी शेट्टीने जिंकला ‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’चा किताब; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 10:55 IST2018-12-09T10:55:00+5:302018-12-09T10:55:40+5:30
काल रात्री या शोचे ग्रॅण्ड फायनल रंगले आणि यात उर्वीला विजेती घोषित करण्यात आले.

उर्वी शेट्टीने जिंकला ‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’चा किताब; पाहा फोटो
एमटीव्हीवर येणा-या ‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ या मॉडेलिंग रिअॅलिटीचे ग्रॅण्ड फायनल मॉडेल उर्वी शेट्टी जिंकले. काल रात्री या शोचे ग्रॅण्ड फायनल रंगले आणि यात उर्वीला विजेती घोषित करण्यात आले.

‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल’ ठरलेली २३ वर्षांची उर्वी शेट्टी ही मुळची मुंबईची आहे. मॉडेलिंगच्या दुनियेत ती बरीच अॅक्टिव्ह आहे.

‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’चे फिनाले सिंगापूरमध्ये ठेवण्यात आले होते. येथे निशा यादव आणि रौशाली यादव यांना नमवून उर्वीने ‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’चा किताब जिंकला.

उर्वीला मॉडेलिंगचा अनुभव होताच. पण तिच्या एक्सप्रेशन्सवरून तिने प्रेक्षक व जजेसच्या मनात घर केले.
शोदरम्यानचे अनेक टास्क तिने अगदी कौशल्याने पूर्ण केले.

उर्वी सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती आपले रोज नवे हॉट फोटो शेअर करत असते.

तिचे फोटो बघता, सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड नट्यांपेक्षा जराही कमी नाही, हेच दिसते.

तिचे सौंदर्य आणि घायाळ करणाºया अदा बघता, उर्वी लवकरच बॉलिवूडमध्ये दिसली तर नवल वाटायला नको.

या फोटोत उर्वीने डोळ्यांवर पट्टी बांधून अशी आकर्षक पोज दिली.