उर्वशी शर्मा होणार दुस-यांदा आई, शुभेच्छा द्यायला पोहोचले अनेक सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 10:04 IST2017-10-03T12:55:33+5:302017-10-04T10:04:26+5:30

उर्वशी शर्मा उर्फ रायना जोशीने चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे. ती म्हणजे उर्वशी (रायना)  आता दुस-यांदा आई होणार ...

Urvashi Sharma's Second Mother, Happy Birthday, Many Celebrities | उर्वशी शर्मा होणार दुस-यांदा आई, शुभेच्छा द्यायला पोहोचले अनेक सेलिब्रेटी

उर्वशी शर्मा होणार दुस-यांदा आई, शुभेच्छा द्यायला पोहोचले अनेक सेलिब्रेटी

्वशी शर्मा उर्फ रायना जोशीने चाहत्यांना एक गुड न्युज दिली आहे. ती म्हणजे उर्वशी (रायना)  आता दुस-यांदा आई होणार आहे.एक माँ जो लाखो के लिए बनी ‘अम्मा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर उर्वशी झळकली होती.या मालिकेत 1970-80च्या दशकाची मुंबईची लेडी डाँनची भूमिका तिने साकारली होते. उर्वशी ही सिनेनिर्माता-अभिनेता सचिन जोशीची पत्नी आहे. तर या दाम्पत्याला तीन वर्षांची मुलगी असून तिचे नाव समायरा आहे. लग्नानंतर उर्वशीने नाव बदलून रैना जोशी असे ठेवले आहे.उर्वशीच्या सासू-सास-यांनी पुण्यात उर्वशीचे थाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला.यावेळी उर्वशी पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता यांत ती अतिशय सुंदर दिसत होती. या कार्यक्रमाला उर्वशी आणि सचिनच्या नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती. तर क्रिकेटपटू श्रीसंत पत्नी आणि मुलीसोबत या कार्यक्रमात पोहोचला होता.आता उर्वशी पुन्हा आई होणार असल्यामुळे तिच्या घरातही आनंदाचे वातावरण असून आत्तापासूनच उर्वशी आपल्या बाळासाठी अनेक गोष्टीच्या तयारी लागली आहे.

Also Read:या कारणांमुळेच तिने ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला? वाचा काय आहेत ती कारणं

'नकाब', 'थ्री','खट्टा मीठा'.'आक्रोश','चक्रधर' सिनेमात अभिनेत्री उर्वशी शर्माने बॉलिवूडमध्ये काम केले आहे. मात्र हे सिनेमे फारसे काही कमाल दाखवू शकले नाही. त्यानंतर सिनेनिर्माता सचिन जोशीसह ती विवाह बंधनात अडकली.कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून तिने सिनेमात काम करणे बंद केले. त्यानंतर उर्वशीने ग्लॅमरच्या दुनियेत मागे वळून पाहिलेच नाही. रूपेरी पडद्यावर फारशी कमाल न दाखवू शकलेल्या उर्वशीला मालिकांसाठी ब-याच ऑफर्स आल्या. मात्र उर्वशीला लहान मुलगी असल्यामुळे जास्त वेळ शूटिंगला देणे शक्य होत नव्हते. त्यात 'अम्मा' मालिकेचे शूट मुंबईत न होता हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये होत होते.शुटसाठी आठवड्यातली 5 दिवस तरी तिला हैद्राबादला जावे लागायचे. उर्वशीला एक लहान मुलगी आहे.शुटींगमुळे तिला तिच्या मुलीला वेळ देता येत नव्हता. शूटींग दरम्यान वेळोवेळी तिच्या मुलीची ती विचारणा करत असायची मात्र मुली पासून जास्त दिवस लांब राहणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने 'अम्मा' या मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Urvashi Sharma's Second Mother, Happy Birthday, Many Celebrities