तमिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार उर्वशी रौतेला, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट
By गीतांजली | Updated: December 23, 2020 14:44 IST2020-12-23T14:41:24+5:302020-12-23T14:44:25+5:30
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

तमिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार उर्वशी रौतेला, सिनेमातील फर्स्ट लूक आऊट
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकताच उर्वशीने तिचा एका सिंपल साडीतला फोटो शेअर केला आहे. हा लूक तिच्या आगामी सिनेमातील आहे. तमिळ सिनेमा 'थिरुट्टू पायले 2' च्या हिंदी रिमेकमध्ये ती झळकणार आहे. उर्वशी यात काय भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती व्हर्जिन भानुप्रिया या कॉमेडी ड्रामा चित्रपटात दिसली होती. यात गौतम गुलाटी आणि अर्चना पूरन सिंग यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
उर्वशीने 2011 मध्ये मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट तिच्या झोळीत पडला.