IND vs PAK मॅचमुळे उर्वशीचं लाखोंचं नुकसान, अभिनेत्रीचा सोन्याचा iPhone हरवला, ट्वीट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 15:23 IST2023-10-15T15:22:15+5:302023-10-15T15:23:40+5:30

World Cup 2023: भारत-पाक सामन्याला उपस्थित राहणं उर्वशीला महागात पडलं, अभिनेत्रीचं लाखोंंचं नुकसान

urvashi rautela lost her 24carat gold iphone in ind vs pak at narendra modi stadium | IND vs PAK मॅचमुळे उर्वशीचं लाखोंचं नुकसान, अभिनेत्रीचा सोन्याचा iPhone हरवला, ट्वीट करत म्हणाली...

IND vs PAK मॅचमुळे उर्वशीचं लाखोंचं नुकसान, अभिनेत्रीचा सोन्याचा iPhone हरवला, ट्वीट करत म्हणाली...

सध्या जिकडेतिकडे वर्ल्डकपचा फिव्हर आहे. शनिवारी(१४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रंगतदार सामना झाला. भारताने ७ गडी राखून पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला गेला. वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तानमधील या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. गृहमंत्री अमित शाहांसह अनेक सेलिब्रिटीही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेदेखील भारत-पाक सामन्याला हजेरी लावली होती. पण, हा सामना तिला खूपच महागात पडल्याचं दिसत आहे. 

या सामन्यामुळे उर्वशीचं लाखोंचं नुकसान झालं आहे. भारत-पाकिस्तान सामना बघायला गेलेल्या उर्वशीचा आयफोन हरवला आहे. या सामन्यादरम्यान उर्वशीचा iPhone चोरीला गेला आहे. उर्वशीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. "२४ कॅरेट सोन्याचा आयफोन नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे हरवला आहे. कोणाला मिळाला, तर कृपया माझ्याशी संपर्क साधा", असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

भारत-पाकिस्तानमध्ये रंगलेला सामना बघायला गेलेल्या उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन अनेक व्हिडिओ शेअर केले होते. यावरुन तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. उर्वशीचं नाव भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतशी जोडलं गेलं होतं. त्यानंतर उर्वशी पाकिस्तानी क्रिकेटरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या ट्वीटमुळे उर्वशी पुन्हा चर्चेत आली आहे. 

Web Title: urvashi rautela lost her 24carat gold iphone in ind vs pak at narendra modi stadium