उर्वशी रौतेलाने खरेदी केला आलिशान बंगला, यश चोप्रांची बनली शेजारी, नव्या घरात झाली शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:16 IST2023-05-30T13:11:33+5:302023-05-30T13:16:08+5:30

उर्वशी रौतेला गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबईत स्वत:साठी घर शोधत होती, मात्र तिचा हा शोध संपला आहे.

Urvashi rautela became yash chopra neighbor in mumbai know full details | उर्वशी रौतेलाने खरेदी केला आलिशान बंगला, यश चोप्रांची बनली शेजारी, नव्या घरात झाली शिफ्ट

उर्वशी रौतेलाने खरेदी केला आलिशान बंगला, यश चोप्रांची बनली शेजारी, नव्या घरात झाली शिफ्ट

उर्वशी रौतेलाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:साठी स्थान निर्माण केले नसेल, तरी अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत असते. ऋषभ पंतसोबत त्याचे नाव अनेकदा जोडले गेले आहे. मात्र याकडे दोघांनी नेहमीच दुर्लक्ष केले. आता उर्वशी रौतेलाबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. उर्वशीच्या घराचा शोध पूर्ण झाला असून ती नव्या बंगल्यात शिफ्ट झाल्याचं सांगण्यात येत आहे.

उर्वशी रौतेला गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुंबईत स्वत:साठी घर शोधत होती आणि तिचा शोध संपल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार, उर्वशी रौतेला जुहू येथील यश चोप्रा यांच्या बंगल्याजवळील बंगल्यात शिफ्ट झाली आहे. हा तोच बंगला आहे ज्यात यश चोप्राची पत्नी पामेला चोप्रा राहत होत्या. याच बंगल्यात  20 एप्रिल रोजी पामेला चोप्राचं निधन झालं.

रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी उर्वशीने लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील 'सेलेस्ट'मध्ये राहण्यासाठी बंगला तयार केला होता. पण ती तिकडे शिफ्ट झाली नाही. त्याऐवजी उर्वशीने राहण्यासाठी जुहूचा बंगला निवडला. अभिनेत्री नुकतीच त्यात शिफ्ट झाली असून तिने सुंदर सजावट केल्याचे वृत्त आहे. उर्वशी नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पॉट झाली होती.

कान्समध्ये या अभिनेत्रीने तिच्या प्रत्येक लूकने चाहत्यांची मने जिंकली. ज्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. कान्समध्ये उर्वशी केवळ तिच्या लूकमुळेच नव्हे तर तिने परिधान केलेल्या मगरीच्या नेकलेसची ही चर्चा होती.

Web Title: Urvashi rautela became yash chopra neighbor in mumbai know full details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.