उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 11:07 IST2023-07-13T11:05:07+5:302023-07-13T11:07:29+5:30

प्रसिद्ध दिग्दर्शकाची उर्फी जावेदला ऑफर, 'या' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा

Urfi Javed will make her bollywood debut with ekta kapoor love sex aur dhoka 2 movie | उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? मोठ्या चित्रपटाची मिळाली ऑफर

चित्रविचित्र कपड्यांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परंतु, यावेळी उर्फीच्या कपड्यांची नाही तर बॉलिवूड पदार्पणाची चर्चा रंगली आहे. उर्फी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शिका एकता कपूरच्या चित्रपटाची उर्फीला ऑफर असल्याची माहिती आहे. 

'ईटाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, एकता कपूरच्या लव्ह, सेक्स और धोका या चित्रपटाच्या सीक्वेलसाठी उर्फीला विचारण्यात आलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेची उर्फीला ऑफर असल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्फी जावेद एकता कपूरच्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. उर्फीच्या जवळच्या व्यक्तीकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर 'आई कुठे...' फेम अरुंधती भारावली, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

"'लव्ह, सेक्स और धोका २' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी उर्फीला विचारण्यात आलं आहे. या चित्रपटातून उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा विचार करत आहे," अशी माहिती उर्फीच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. लव्ह, सेक्स और धोका या चित्रपटाचा पहिला भाग २०१० साली प्रदर्शित करण्यात आला होता. 

"माझी पत्नी काहीही...", ३५ पुरणपोळ्यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, उर्फीने मालिकेत काम करत तिच्या कलाविश्वातील करिअरला सुरुवात केली. 'बिग बॉस ओटीटी'सारख्या रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. 'एमटीव्ही स्प्लिट्सविला' या शोमध्येही ती दिसली होती. 
 

Web Title: Urfi Javed will make her bollywood debut with ekta kapoor love sex aur dhoka 2 movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.