एक चुटकी सिंदूर... उर्वशी रौतेलाच्या नव्या फोटोमुळे पुन्हा रिषभ पंतची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 17:10 IST2022-10-11T17:05:13+5:302022-10-11T17:10:12+5:30

उर्वशीने शेअर केलेला नवा फोटो पाहून नेटकऱ्यांना रिषभ पंतची आठवण झाली आहे.

Urarshi Rautela new pic viral wearing vermilion fans asked is this for Rishabh Pant | एक चुटकी सिंदूर... उर्वशी रौतेलाच्या नव्या फोटोमुळे पुन्हा रिषभ पंतची चर्चा

एक चुटकी सिंदूर... उर्वशी रौतेलाच्या नव्या फोटोमुळे पुन्हा रिषभ पंतची चर्चा

Urvashi Rautela Latest Post: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) आणि भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्यातला ड्रामा काही केल्या संपण्याचं नाव घेत नाही. भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पर्थमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर उर्वशी पण ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. 
तर दुसरीकडे अभिनेत्रीची इंस्टाग्रामवरील एक पोस्टही चर्चेत आली आहे. उर्वशीने साडी परिधान केलेला आणि भांगेत सिंदूर भरलेला एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांना रिषभ पंतची आठवण झाली आहे. 

इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्वशी सिंपल लूकमध्ये दिसत आहे, तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.  गळ्यात मंगळसूत्र, भांगेत सिंदूर भरले आहे. या फोटोसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की,प्रेम में पड़ी प्रेमिका को, सिन्दूर से प्रिय कुछ नहीं होता !! सारी रस्म रिवाज़ के साथ चाहिए, उम्रभर का साथ पिया तुमसे !! उर्वशीची ही पोस्ट पाहून लोक म्हणत आहेत की मॅडमने ही साज श्रृंगार फक्त पंतसाठी केला आहे. 

नेटकरी विचारतायेत प्रश्न 
उर्वशीने हा फोटो पोस्ट करताच व्हायरल झाला असून काही तासांतच त्यावर लाखो लाईक्सही आले आहेत. युजर्सनी यावर प्रचंड कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका यूजरने लिहिले की, 'रिषभ पंतला आता सोड, T20 वर्ल्ड कपनंतर तुम्हा दोघांचे लग्न लावून देऊ.' त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले- 'रिषभ भैया, प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. अभिनंदन.' त्याचवेळी एका यूजरने लिहिले- 'हे सिंदूर रिषभ पंतसाठी आहे का? काहीही असो प्रेम तरी खरे वाटतंय. भाभीजी चालू ठेवा.

रिषभ आणि उर्वशीत नेमका काय वाद? 
उर्वशी आणि पंत यांच्यातील वाद स्वतः उर्वशीने सुरू केला होता. एका मुलाखतीत उर्वशीने अप्रत्यक्षपणे ऋषभचे नाव घेत म्हटले होते की, 'एक क्रिकेटर हॉटेलच्या लॉबीमध्ये 10 तास माझी वाट पाहत होता.' उर्वशीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतनेही तिला टोमणे मारणारी एक इन्स्टा स्टोरी टाकली होती. रिषभ पंतने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये नाव न घेता लिहिले- 'ताई माझा पाठलाग करणे सोड.' मात्र, रिषभने इन्स्टा स्टोरी लगेचच डिलीट केली.


 

Web Title: Urarshi Rautela new pic viral wearing vermilion fans asked is this for Rishabh Pant