Uorfi Javed : "पॉर्न साईटवर माझा फोटो अपलोड झाला अन्..."; उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा, सांगितलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 15:43 IST2023-05-27T15:06:58+5:302023-05-27T15:43:29+5:30

Uorfi Javed : उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. एकीकडे उर्फीला खूप पसंती मिळत आहे तर दुसरीकडे ती ट्रोलही झाली आहे.

Uorfi Javed would often faint after getting beaten up by her father also her pic uploaded on porn website | Uorfi Javed : "पॉर्न साईटवर माझा फोटो अपलोड झाला अन्..."; उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा, सांगितलं दु:ख

Uorfi Javed : "पॉर्न साईटवर माझा फोटो अपलोड झाला अन्..."; उर्फी जावेदचा धक्कादायक खुलासा, सांगितलं दु:ख

उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह राहते आणि तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे ती नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. एकीकडे उर्फीला खूप पसंती मिळत आहे तर दुसरीकडे ती ट्रोलही झाली आहे. मात्र, या सगळ्यामध्ये उर्फीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच दरम्यान उर्फीने तिला कोणत्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागलं हे सांगितलं आहे. 

उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी रणवीर अल्लाहबादिया पॉडकास्ट 'बीरबाइसेप्स' मध्ये भाग घेतला होता. यादरम्यान उर्फीला तिचे जुने दिवस आठवले. उर्फीने सांगितलं की, ती रूढीवादी मुस्लिम कुटुंबात वाढली आणि तिच्यावर अनेक बंधने होती. पण असे असूनही उर्फीला स्वतः साठी काहीतरी मोठं आणि चांगलं करायचं होतं. उर्फीला सुरुवातीपासूनच फॅशन करायला आवडते आणि त्यामुळे तिला अनेकदा त्रासाला सामोरं जावं लागलं.

पॉर्न साइटवर फोटो अपलोड

उर्फी सांगते की, अनेकदा ती पूर्ण कपडे घालून घरातून बाहेर पडायची आणि बाहेर आल्यावर तिचा लूक आणि स्टाइल बदलायची. एक किस्सा शेअर करताना उर्फीने सांगितले की, सुमारे 10 वर्षांपूर्वी लखनौमध्ये तिने ट्यूब टॉप घातला होता, जी त्यावेळी त्या शहरातील सामान्य लोकांसाठी खूप मोठी गोष्ट होती. पण कोणीतरी तिचा फोटो पॉर्न साइटवर अपलोड केला आणि अभिनेत्रीच्या वडिलांना याची माहिती मिळाली.

मारहाणीमुळे उर्फी बेशुद्ध झाली

उर्फीने स्पष्ट केलं की, तिचा फोटो मॉर्फ केलेला नव्हता, म्हणजे तिने जे परिधान केले होते तोच फोटो अपलोड केला होता. यामुळेच तिच्या वडिलांना तिला खूप मारलं. मारहाण म्हणजे केवळ थप्पड मारणं नव्हतं तर बेदम मारहाण होती, असेही उर्फीने स्पष्ट केले. मारहाणीमुळे उर्फी बेशुद्ध झाली होती. खानदानाचं नाव खराब झाल्याचं तिला सांगण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Uorfi Javed would often faint after getting beaten up by her father also her pic uploaded on porn website