Uorfi Javed : "लवकरच तुला गोळी मारण्यात येईल, मिशन पूर्ण होईल"; उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:30 IST2023-08-17T13:22:59+5:302023-08-17T13:30:57+5:30
Uorfi Javed : उर्फी जावेदने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Uorfi Javed : "लवकरच तुला गोळी मारण्यात येईल, मिशन पूर्ण होईल"; उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी
अभिनेत्री उर्फी जावेद ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिचा ऑफबीट फॅशन सेन्स सर्वांचच लक्ष वेधून घेतो. उर्फी तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. तिचे फॅशन स्टेटमेंट खूप बोल्ड आणि ग्लॅमरस असतात. अनेकवेळा ती तिच्या या फॅशन सेन्समुळे अडचणीतही येते. शिवाय तिला खूप ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागत आहे. आता एका युजरने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
उर्फी जावेदने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एका युजरने तिला जीवे धमकी दिली आहे. "लवकरच तुला गोळी मारण्यात येईल. लवकरच मिशन पूर्ण होईल, तू जी भारतात सर्व घाण पसरवली आहेस ती साफ केली जाईल" असं या युजरने म्हटलं आहे. तर उर्फीने ही पोस्ट शेअर करत माझ्या आयुष्यातील रोजचा दिवस असं कॅप्शन दिलं आहे.
Regular day in my life pic.twitter.com/fHs19hLeEy
— Uorfi (@uorfi_) August 16, 2023
काही दिवसांपूर्वी उर्फीचा चेहरा खराब झाला होता. सोशल मीडियावर उर्फीने स्वत:च याबाबत माहिती दिली होती. अभिनेत्रीला तिच्या कपड्यांव्यतिरिक्त डार्क सर्कलमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. तिच्या फोटोमध्ये नेहमीच डार्क सर्कल दिसतात. ट्रोलिंगला कंटाळून तिने ट्रिटमेंट केली पण त्याचा विपरित परिणाम झाला.
डार्क सर्कल लपविण्यासाठी उर्फीने आय फिलर केले, परंतु हे केल्यानंतर तिच्या डोळ्यांखाली सूज आली आणि फिलरमुळे ती खूप वेगळी दिसते. आय फिलरनंतर तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लेटेस्ट फोटो अपलोड केला होता. ज्यामध्ये डोळयांच्या खाली सूज आणि रेडनेस पाहायला मिळाला. फोटो शेअर करत अभिनेत्रीने स्वतःबद्दलच राग व्यक्त केला. मेकअप केल्यावर देखील डोळे चांगले दिसणार नाहीत असं म्हटलं होतं.