सेलिब्रेटींच्या मुलांचे ‘युनिक’ नाव !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 18:16 IST2016-09-19T12:46:08+5:302016-09-19T18:16:08+5:30
आपल्या मुलांचे नाव जगावेगळे आणि असाधारण पाहिजे हा जणू ट्रेंडच निर्माण झाला आहे. हॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या मुलांचे नावे असेच ...

सेलिब्रेटींच्या मुलांचे ‘युनिक’ नाव !!!
१) शाहरुख आणि गौरी खान
गौरी आणि शाहरुख खानला तिन मुले आहेत. आर्यन, सुहाना आणि अब्राम. आर्यन म्हणजे योद्धा आणि सुहाना म्हणजे मोहक . शाहरुखने तिसºया मुलाचे नाव ‘अब्राम’ असे युनिक ठेवले आहे. याबाबत शाहरुखच्या स्पष्टीकरणानूसार त्याची पत्नी हिंदू असून अब्रामच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करीत ‘राम’ शब्दाचा समावेश केला आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम धर्माची ऐक्यता या नावात आहे हे दर्शविले आहे.
२) ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन
बॉलिवूडमधील उत्कृष्ट कपल ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी भारतीय परंपरा आणि संस्कृती जोपासत आपल्या मुलीचे नाव ‘आराध्या’ ठेवले आहे. आराध्या म्हणजे उपासना होय.
३) राणी मुखर्जी आणि अदित्य चोप्रा
राणी आणि आदित्य यांनी तर आपल्या मुलीच्या नावात तर दोघांच्या नावांचा समावेश केला आहे. त्यांनी मुलीचे नाव ‘अदिरा’ असे ठेवले आहे. आदित्य नावातील ‘अदि’ आणि राणी नावातील ‘रा’ असे मिळून अदिरा हे नाव ठेवले आहे. आणि याचाच अर्थ आदरणीय देखील होतो.
४) शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा
शिल्पा आणि राजला आपल्या मुलाचे नाव सिंबॉलीक हवे होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘विआन’ असे ठेवले. विआन म्हणजे आयुष्यभरासाठीची ताकद होय.
५) इमरान खान आणि अवंतिका मलिक
इमरान आणि अवंतिकाने देखील आपल्या मुलीचे नाव आगळे-वेगळे म्हणजेच ‘इमरा’ असे ठेवले आहे. इमरा म्हणजे मजबूत आणि निग्रही होय. या कपलने देखील आपल्या मुलीच्या नावात दोघांच्या आडनावाचा समावेश केला आहे.
६) सुझान खान आणि हृतिक रोशन
या जोडप्यानेही आपल्या दोघे मुलांचे नाव युनिक ठेवले आहेत. पहिल्या मुलाचे नाव हिृधान आणि दुसºया मुलाने रेहान होय. हिृधान म्हणजे मोठ्या हृदयाचा व्यक्ति आणि रेहान म्हणजे परमेश्वराने निवडलेला.
७) आमिर खान आणि किरण राव
आमिर खानने तर आपल्या मुलाचे नाव त्याचे पणजोबा आणि प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक मौलाना आझाद यांचा आदर्श घेऊन ठेवले आहे, ते म्हणजे आझाद राव खान. आझाद म्हणजेच मुक्त किंवा स्वतंत्र होय.
८) मान्यता आणि संजय दत्त
मान्यता आणि संजय दत्तने इराणी आणि यहुदी भाषेची प्रेरणा घेऊन आपल्या जुळ्या मुलांचे नाव ठेवली आहेत. शहरान मुलाचे आणि इकरा हे मुलीचे नाव ठेवले आहे. शहरान म्हणजेच योद्धा आणि इकरा म्हणजे यहुदी मध्ये शिक्षित होय.
९) अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना
अक्षय आणि ट्विंकलने निर्णय घेऊन भारतीय नावांना प्राधान्य देत आपल्या मुलांचे नाव आरव आणि नितारा ठेवले आहे. आरव म्हणजे ज्याचा खूप आदर केला जातो आणि नितारा म्हणजे संस्कृतीशी जोडलेली.
१०) काजोल आणि अजय देवगण
काजोल आणि अजय देवगणने ग्रीसची प्रेरणा घेऊन पहिल्या मुलीचे नाव ‘न्यासा’ ठेवले. याचाच अर्थ नव्याने सुरुवात किंवा अपेक्षा होय. दुसºया मुलाचे नाव युग ठेवले. युगचा अर्थ अनेरा होय.