'unhappy' Holi राम गोपाल वर्मा पुन्हा बरळलेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 15:42 IST2017-03-13T10:12:15+5:302017-03-13T15:42:15+5:30

 वादग्रस्त ट्विट करून रोज नवे वाद करण्याची खोड पडलेल्या राम गोपाल वर्मांनी होळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक वादग्रस्त ट्विट केले ...

'Unhappy' Holi Ram Gopal Varma Again ... | 'unhappy' Holi राम गोपाल वर्मा पुन्हा बरळलेच...

'unhappy' Holi राम गोपाल वर्मा पुन्हा बरळलेच...

 
ादग्रस्त ट्विट करून रोज नवे वाद करण्याची खोड पडलेल्या राम गोपाल वर्मांनी होळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक वादग्रस्त ट्विट केले आहे. महिला दिनी असेच एक ट्विट करून राम गोपाल वर्मा यांनी वाद ओढवून घेतला होता. केवळ वादच नाही तर याप्रकरणी त्यांच्याविरोधात दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आता होळीच्या शुभेच्छा देत राम गोपाल यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कोत्या मानसिकतेचं दर्शन घडवल आहे, असेच म्हणावे लागेल. 
 होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात, असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले आहे.

मला माहित नाही, कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, पण असे मादक क्षण निर्माण केल्याबद्दल मी राक्षसांचे आभार मानतो, असेही एका अन्य ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.


 इथेच ते थांबले नाहीत तर, १२० कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी साजरा करण्याचं कारण माहित आहे का, मला शंका वाटते. पण सगळे भांग पितात, असेही त्यांनी म्हटले आहे़

सनी लिओन जितका आनंद देते, तितकाच आनंद जगभरातील सर्व महिलांनी पुरुषांना द्यावा, अशी इच्छा आहे, असे ट्विट  राम गोपाल वर्मांनी केले होते़ त्यावर आक्षेप घेत राम गोपाल वर्मांनी माफी मागावी, किंवा परिणामांना सामोरं जावं, कायदा हातात घेण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राम गोपाल यांना या ट्विटवरून फैलावर घेतले होते.
 

Web Title: 'Unhappy' Holi Ram Gopal Varma Again ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.