UNBEARABLY HOT : ​ही आहे, ‘साहो’मधील प्रभासच्या नव्या लूकची एक झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 12:59 IST2017-07-18T07:29:03+5:302017-07-18T12:59:56+5:30

केवळ साऊथचेच नाही तर बॉलिवूडचे प्रेक्षकही अभिनेता प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. ‘बाहुबली’ या चित्रपटात प्रभासने ...

UNBEARABLY HOT: This is a glimpse of the new look of Prabhas in Saho! | UNBEARABLY HOT : ​ही आहे, ‘साहो’मधील प्रभासच्या नव्या लूकची एक झलक!

UNBEARABLY HOT : ​ही आहे, ‘साहो’मधील प्रभासच्या नव्या लूकची एक झलक!

वळ साऊथचेच नाही तर बॉलिवूडचे प्रेक्षकही अभिनेता प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. ‘बाहुबली’ या चित्रपटात प्रभासने योद्धा साकारला. पण आपल्या या आगामी चित्रपटात प्रभास एकदम मॉडर्न लूकमध्ये दिसणार आहे. प्रभासच्या ताज्या फोटोशूटचा एक नवा फोटो सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतो आहे. हा प्रभासचा ‘साहो’मधील लूक असल्याचे मानले जात आहे. सोशल मीडियावर प्रभासचा हा नवा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अर्थात ‘साहो’च्या मेकर्सनी अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या नव्या फोटात प्रभास लूक एकदम हटके आहे. हा फोटो पाहून देशातील लाखो तरूणी पुन्हा प्रभासच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत.



‘साहो’ एक बिग बजेट चित्रपट आहे. मोठ्या स्तरावर हा चित्रपट शूट केला जाणार आहे. यासाठी ‘साहो’ची संपूर्ण टीम अबुधामीसह जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. ‘साहो’मध्ये प्रभासच्या अपोझिट कोण दिसणार, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. आधी या चित्रपटात अनुष्का शेट्टी प्रभासची हिरोईन बनणार अशी बातमी आली. पण नंतर आपल्या वाढत्या वजनामुळे अनुष्काने हा चित्रपट हातचा गमावल्याची बातमी झळकली. चित्रपटाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का शेट्टीचे वजन अद्यापही पाच ते आठ किलोंनी वाढलेले आहे. या चित्रपटात हिरोईन एकदम सेक्सी लूकमध्ये दिसणार असल्याने अनुष्का या चौकटीत तूर्तास तरी फिट बसत नाही.

ALSO READ : अनुष्का शेट्टीचे वजन होईना कमी! प्रभासच्या ‘साहो’मधून झाली ‘छुट्टी’!!

या महिन्याच्या अखेरपासून ‘साहो’चे शूटींग सुरु होत आहे. प्रभास या चित्रपटासाठी कमालीचा एक्ससाईटेड आहे. तामिळ, तेलगू व हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे,  स्वत: चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभास स्वत: डब करणार आहे.

Web Title: UNBEARABLY HOT: This is a glimpse of the new look of Prabhas in Saho!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.