जुनुनियत आठवड्यापूर्वी प्रदर्शित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 17:35 IST2016-06-12T12:05:18+5:302016-06-12T17:35:18+5:30

जुनुनियतच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख आता १७ जून रोजी केली आहे. उडता पंजाबच्या वादामुळे आता या तारखेस कोणताही दुसरा चित्रपट ...

Unannounced weekends will be displayed | जुनुनियत आठवड्यापूर्वी प्रदर्शित होणार

जुनुनियत आठवड्यापूर्वी प्रदर्शित होणार

नुनियतच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख आता १७ जून रोजी केली आहे. उडता पंजाबच्या वादामुळे आता या तारखेस कोणताही दुसरा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने या दिवशी जुनुनियतचे प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. आता एक आठवड्याअगोदर याचे प्रदर्शन होणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यासंदर्भात एक पत्रक काढले आहे. तयार असलेला, लोकप्रिय गाणी, चित्रपटाविषयी उत्सुकता, यु प्रमाणपत्र सेन्सॉरकडून कोणताही कट नाही ही प्रदर्शनासाठीची कारणे त्यांनी दिली आहेत.
२४ जून ऐवजी १७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्यादिवशी प्रदर्शित होणारा तो एकमेव चित्रपट ठरेल. 
चित्रपट अभिनेत्री यामी गौतम हिच्या अनुसार ‘आम्ही १७ जून रोजी येत असल्याचे आम्ही कळवित आहोत. आम्ही अगदी जवळ होतो, आता त्याहूनही जवळ आलो आहोत.’

Web Title: Unannounced weekends will be displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.