Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संकटावर शेअर केले 'मीम'; अर्शद वारसीवर नेटिझन्स भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:51 IST2022-02-24T16:35:59+5:302022-02-24T16:51:39+5:30
Russia-Ukraine Crisis: बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने रशिया-युक्रेन संकटावर 'गोलमाल' चित्रपटातील एक व्हिडिओ मीम शेअर केले आहे.

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संकटावर शेअर केले 'मीम'; अर्शद वारसीवर नेटिझन्स भडकले
मुंबई: सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात वाढत चाललेल्या तणावामुळे जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. रशियाने युक्रेनच्या काही भागांवर तिन्ही बाजूंनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या परिस्थितीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी याने शेअर केलेल्या एका मीम व्हिडिओमुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.
Self explanatory… Golmaal was way ahead of its time…. 😂😂 pic.twitter.com/2vhvhHPskA
— Arshad Warsi (@ArshadWarsi) February 24, 2022
अर्शद वारसी याने त्याच्या गोलमाल चित्रपटातील एक सीन शेअर केला असून, त्यात रशिया-युक्रेनची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. मुळात अर्शदने हा एक व्हिडिओ एक विनोद म्हणून शेअर केला, पण त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण या व्हिडिओला मस्करीत घेत आहेत, तर काहीजण त्याच्यावर टीका करत आहेत.
व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया
अर्शदने विनोद म्हणून हा व्हिडिओ शेअर केला, पण आता त्यावर अनेकजण टीका करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'हे बरोबर नाही सर. या युद्धात अनेक लोक मरतील, विनोदाच्या बाहेरचा विचार करा.' दुसऱ्या एका चाहत्याने अर्शद वारसीची बाजू घेत म्हटले की, 'अर्शद भाईने विनोद केला नाही, योग्य परिस्थिती मांडली. वाईट वेळ आली की सगळे निघून जातात.'