काम मिळत नसल्याने उदय चोपडाचे झाले असे हाल; आलिशान बंगला विकावा लागला बेभाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:56 IST2018-06-06T12:25:33+5:302018-06-06T17:56:47+5:30
फिल्मी दुनियेतून गायब असलेला अभिनेता उदय चोपडा गेल्या काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड नर्गिस फाखरीशी झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आला होता. रिपोर्ट्सनुसार, ...

काम मिळत नसल्याने उदय चोपडाचे झाले असे हाल; आलिशान बंगला विकावा लागला बेभाव!
फ ल्मी दुनियेतून गायब असलेला अभिनेता उदय चोपडा गेल्या काही दिवसांपूर्वी गर्लफ्रेंड नर्गिस फाखरीशी झालेल्या ब्रेकअपमुळे चर्चेत आला होता. रिपोर्ट्सनुसार, नर्गिस सध्या एका अमेरिकी दिग्दर्शकाला डेट करीत आहे. वास्तविक तिने तिच्या नात्याबद्दल अद्यापपर्यंत खुलासा केला नाही, मात्र त्यांच्यातील प्रेमप्रकरण चांगलेच बहरत असल्याचे समोर येत असलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होते. दरम्यान, उदय चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
त्याचे झाले असे की, उदय चोपडाचा लॉस एंजिल्सस्थित हॉलिवूड हिल्समधील एक आलिशान बंगला त्याने विकला आहे. लॉस एंजिल्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दो स्टोरी व्हिला’ला उदयने दोन वर्षांपूर्वी एका कॉर्पोरेटरला ३.०२५ मिलियन डॉलरला विकला. वास्तविक उदयने हा व्हिला ३.७९९ मिलियन डॉलरला (जवळपास २५.३ कोटी) खरेदी केला होता.
त्यामुळे त्याने एवढा आलिशान बंगला बेभाव विकण्याचे काय कारण? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे. व्हिलाच्या इंटेरियरविषयी सांगायचे झाल्यास, आतून त्याचे डिझाइन खूपच उत्तमरीत्या केलेले आहे. बंगल्याच्या बहुतांश भिंती या काचेच्या आहेत. व्हिलाचा पहिला मजला ३-४ बेडरूमचा आहे. त्यास खास वुडनने बनविले आहे.
काही दिवसांपूर्वीच उदय चोपडा त्याच्या एका ट्विटमध्ये यूजर्सच्या निशाण्यावर आला होता. उदयने ट्विटमध्ये लिहिले होते की, जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला असे वाटत होते की, मला माझ्या आडनावासारखेच आडनाव असलेल्या मुलीशी लग्न करावे लागेल. मला असे वाटायचे की, असा कायदा आहे. मला नव्हते माहीत की, लग्नानंतर मुली त्यांचे आडनाव बदलतात. मी चोपडा आडनाव असलेल्या मुलीचाच शोध घेत आहे.
उदयने हे ट्विट करताच यूजर्सनी त्याचे नाते चक्क प्रियांका चोपडा, शर्लिन चोपडा आणि परिणिती चोपडाशी जोडले. या ट्विटनंतर त्याला ट्रोलर्सचा चांगलाच सामना करावा लागला.