टायटल कुछ कहता है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 13:11 IST2016-09-29T07:41:30+5:302016-09-29T13:11:30+5:30

    अनेक जुन्या हिंदी गाण्यांची नावे बऱ्याच चित्रपटांना दिली आहेत. एखाद्या जुन्या सुपरहिट गाण्याचे नाव चित्रपटाला देण्याचा ट्रेंड ...

Tytle says something ... | टायटल कुछ कहता है...

टायटल कुछ कहता है...

 
अनेक जुन्या हिंदी गाण्यांची नावे बऱ्याच चित्रपटांना दिली आहेत. एखाद्या जुन्या सुपरहिट गाण्याचे नाव चित्रपटाला देण्याचा ट्रेंड काही नवा नाही. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, प्यार किया तो डरना क्या , राजा की आयेगी बारात या नव्वदच्या दशकातील काही चित्रपटांना जुन्या गाण्यांची नावे दिली होती. ऐ दिल है मुश्कील या चित्रपटामुळे पुन्हा एकदा जुन्या गाण्याचे नाव चित्रपटाला दिल्याचे पाहायला मिळतेय. अशाच काही चित्रपटांवर एक नजर टाकूयात.....
 
ऐ दिल है मुश्किल : रणबीर, ऐश्वर्या आणि अनुष्का या तिगडीमुळे 'ऐ दिल है मुश्कील' या चित्रपटाची जोरदार चर्चा सिनेवर्तुळात सुरू आहे. या चित्रपटाचे नाव देखील ऐका गाण्यावरूनच घेण्यात आले आहे. १९५६ साली प्रदर्शित झालेल्या 'सीआयडी' या चित्रपटातील 'ऐ दिल है मुश्किल जिना यहाँ...' हे गाणे चांगलेच गाजले. आजही रसिकांच्या मनावर या गाण्याची जादु कायम आहे. 
 
    जब तक है जान : 'शोले' चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट होती. त्यातीलच 'हाँ जब तक है जान मै नाचुंगी' या गाण्यावर हेमा मालिनीने केलेलं नृत्य कोणीच विसरू शकत नाही. ते गाणे प्रेक्षकांच्या मनात आजही आहे. यानतंर यश चोप्रा यांनी 'जब तक है जान' या नावाचा चित्रपट शाहरूख खान आणि कॅटरिना कैफला घेऊन केला. 
 
    ये जवानी है दिवानी : जया भादुरी आणि रणधीर कपूर यांच्या 'जवानी दिवानी' या चित्रपटातील 'ये जवानी है दिवानी, हा मेरी रानी रूक जाओ रानी' हे गाणे चांगलेच हिट झाले होते. करण जोहरने दीपिका, रणबीरला घेऊन याच नावाचा चित्रपट २०१३ साली तयार केला. 
 
कभी अलविदा ना केहेना : 'चलते चलते मेरे ये गीत याद रखना  कभी अलविदा ना केहेना...' हे १९७६ साली प्रदर्शित झालेल्या 'चलते चलते' चित्रपटातील गाणे आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे. याच गाण्याच्या बोलांवर आधारित करण जोहरने तगडी स्टारकास्ट घेऊन कभी अलविदा ना कहेना हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणला. 
 
 जाने तू या जाने ना : 'आ गले लग जा' या चित्रपटातील जाने तु या जाने ना हे गाणे विसरणे शक्यच नाही. शशी कपूर आणि शर्मिला टागोर या रोमँटिक जोडीमुळे आजही हे गाणे एव्हरग्रीन आहे. अब्बास टायरवाला यांनी २००८ साली इमरान खान आणि जेनेलिया या नवीन जोडीला घेऊन 'जाने तू या जाने ना' हा चित्रपट बनविला.
 
 लागा चुनरी मे दाग : 'दिल ही तो है' या 1963 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील 'लागा चुनरी मे दाग छुपाऊँ कैसे...' हे गाणे सुपरहिट झाले हाते. 2007 साली आदित्य चोप्राने लागा चुनरी मे दार या चित्रपटाची निमिर्ती केली. या सिनेमातील राणी मुखजीर्च्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले होते. 

Web Title: Tytle says something ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.