रणबीर-कॅटच्या एका सीनसाठी दोन टँकर पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 17:28 IST2016-04-21T11:58:34+5:302016-04-21T17:28:34+5:30
महाराष्ट्र दुष्काळाच्या आगीत पोळून निघत असताना गत रविवारी रणबीर व कॅटरिना यांच्या एका सीनसाठी तब्बल दोन टँकर पाणी सांडवण्यात ...
.jpg)
रणबीर-कॅटच्या एका सीनसाठी दोन टँकर पाणी!
म ाराष्ट्र दुष्काळाच्या आगीत पोळून निघत असताना गत रविवारी रणबीर व कॅटरिना यांच्या एका सीनसाठी तब्बल दोन टँकर पाणी सांडवण्यात आले. गत रविवारी अनुराग बसू यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचा एक पावसाचा सिक्वेंस शूट करण्यात आला. १२ तासांच्या या सिक्वेंस शूटसाठी मुंबईतील बलार्ड इस्टेट येथे पश्चिम बंगालच्या एका शहराचा सेट तयार करण्यात आला होता. या सेटवर गोलगप्पावाला, निंबूपाणीवाला यांच्यासोबतच ट्रेन, पिवळी टॅक्सी, सायकल रिक्षा व कार सर्वच होते. मुसळधार पावसात अनेक छत्र्यादिसत होत्या. पण यासर्वांमध्ये केवळ रणबीर आणि कॅटरिना हेच दोघे होते. अचानक आलेल्या पावसात या दोघांची धावपळ उडते व आपल्या बॅगांनी ते आपले डोके झाकतात आणि भिजण्यापासून वाचण्यासाठी एका बुक स्टॉलच्या शेडकडे धावतात..असा हा सीन होता. या सीनसाठी सेटवर दोन टँकर पाणी वापरण्यात आले. या पाण्याने सेटवर कृत्रिम पाऊस पाडण्यात आला. महाराष्ट्रातील दुष्काळ बघता, पाण्याचा हा अपव्यय खटकणारा आहे..तेव्हा जागो अनुराग जागो...