काजोल-ट्विंकल खन्नाच्या नवीन टॉक शोचा टीझर प्रदर्शित, 'द ग्रेट कपिल शर्मा शो'ला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 12:39 IST2025-09-14T12:35:30+5:302025-09-14T12:39:56+5:30
'या' दिवशी सुरू होणार काजोल-ट्विंकल खन्नाचा नवीन टॉक शो!

काजोल-ट्विंकल खन्नाच्या नवीन टॉक शोचा टीझर प्रदर्शित, 'द ग्रेट कपिल शर्मा शो'ला देणार टक्कर
बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या दोघी मिळून लवकरच एक नवीन टॉक शो घेऊन येत आहेत, ज्याचं नाव आहे 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' (Two Much With Kajol And Twinkle). या शोच्या माध्यमातून या दोघी पहिल्यांदाच एकत्र होस्टिंग करताना दिसणार आहेत. शोचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये काजोल आणि ट्विंकल यांची खास जुगलबंदी पाहायला मिळतेय.
'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल'मघ्ये होस्ट म्हणून काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघी सेलिब्रिटींसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसतील. समोर आलेल्या टीझरमध्ये काजोल म्हणते, "सेलिब्रिटींच्या बातम्यांनी कंटाळला आहात का?" तर ट्विंकल पुढे म्हणते, "जर तुम्ही कंटाळवाण्या आणि नीरस चॅट शोने कंटाळला असाल, तर हा एक नवीन आणि चांगला सेलिब्रिटी चॅट शो आहे". टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की, "मी फक्त काजोलमुळे हा शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे". तर दुसऱ्याने या शोला 'कॉफी विथ करणचा बाप' असं म्हटलं आहे.
कधी आणि कुठे पाहता येईल?
'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' हा शो २५ सप्टेंबरपासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होईल. या टॉक शोचा एक नवीन भाग दर गुरुवारी प्रदर्शित होणार आहे. 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल'मध्ये या दोन्ही अभिनेत्रींच्या उर्जेचे आणि आकर्षक शैलीचे कॉम्बिनेशन लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.