दो दिल मिल रहे हैं..! रणबीर कपूर आणि आलिया भटचा फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 13:13 IST2021-02-27T13:12:59+5:302021-02-27T13:13:30+5:30
रणबीर कपूर आणि आलिया भटचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

दो दिल मिल रहे हैं..! रणबीर कपूर आणि आलिया भटचा फोटो होतोय व्हायरल
बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी प्रेक्षकांना खूप भावते आहे. चाहत्यांना या जोडीची ऑनस्क्रीन नाही तर ऑफस्क्रीन केमिस्ट्री पहायला आवडते. रणबीर कपूर आणि आलिया भट पहिल्यांदाच ब्रह्मास्त्र चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र यापूर्वी ते दोघे एका जाहिरातीत झळकणार आहेत. या शूटिंगच्या सेटवरील आलिया आणि रणबीरचे काही फोटो समोर आले आहेत. यात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.
रणबीर कपूर आणि आलिया भटचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. या फोटोत आलिया आणि रणबीर यांच्या व्यतिरिक्त दिग्दर्शिका गौरी शिंदेदेखील दिसत आहे. तिघे एकत्र पोझ देताना दिसत आहे. व्हायरल फोटोत आलिया ग्रीन रंगाच्या कुर्ता आणि पिंक रंगाच्या ओढणीत दिसते आहे. तर रणबीर कपूर पोलो टीशर्ट आणि मॅचिंग ट्रॅक पॅण्टमध्ये दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, रणबीर आणि आलिया एका चिप्स ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातून त्यांच्या चाहत्यांना पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा २०१८ साली करण्यात आली होती. यात आलिया व रणबीर शिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया सारखे कलाकार दिसणार आहेत.
सध्या आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यातील आलिया भटच्या कामाची प्रशंसा होत आहे.