ट्विंकल हृतिकला म्हणतेय आपण पार्टी करूया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 12:57 IST2016-07-02T07:27:40+5:302016-07-02T12:57:40+5:30

अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट आणि हृतिक रोशनचा मोहेनजोदारो हा चित्रपट 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची ...

Twinkle says to Hrithik that we will party | ट्विंकल हृतिकला म्हणतेय आपण पार्टी करूया

ट्विंकल हृतिकला म्हणतेय आपण पार्टी करूया

्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट आणि हृतिक रोशनचा मोहेनजोदारो हा चित्रपट 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांची गेली कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार असल्याने यातील कोणता चित्रपट अधिक यशस्वी ठरतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. पण हे दोन्ही चित्रपट एकमेकांचे स्पर्धक नाहीत असे हृतिक रोशन आणि अक्षय यांच्या दोघांचेही म्हणणे आहे. रुस्तम या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकने ट्वीट करून त्याला हा ट्रेलर खूप आवडला असून अक्षयने निवडलेला हा चित्रपट खूप चांगला असल्याचे ट्वीट केले आहे. यावर अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होऊ दे आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी मिळून पार्टी करूया असे हृतिकला उत्तर दिले आहे. बॉलिवुडमध्ये नेहमीच कलाकारांमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. पण अक्षय आणि हृतिकने कोणत्याही स्पर्धेचा विचार न करता यातून खूपच चांगला संदेश इतर बॉलिवुडच्या मंडळींना दिला आहे. 


 

Web Title: Twinkle says to Hrithik that we will party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.