बॉलिवूडमधील या प्रसिद्ध कपलने सांगितले खऱ्या आयुष्यात आम्ही आहोत असे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 16:25 IST2021-03-13T16:21:29+5:302021-03-13T16:25:45+5:30
हे कपल सध्या व्हेकेशन एन्जॉय करत असून त्यांनी आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध कपलने सांगितले खऱ्या आयुष्यात आम्ही आहोत असे...
अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत व्हॅकेशन एन्जॉय करतो आहे. ट्विंकलने अक्षयसोबतचा एक फोटो नुकताच पोस्ट केला आहे. या फोटोत अक्षय आणि ट्विंकल यांना एका वेगळ्याच अंदाजात आपल्याला पाहायला मिळत आहे.
ट्विंकलने शेअर केलेल्या या फोटोत ट्विंकल अक्षयचे नाक ओढताना दिसत आहे. या फोटोसोबत तिने खूप छान कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले आहे की, खऱ्या आयुष्यातील कपल आणि इन्स्टाग्रामवरील कपल यांच्यात खूप फरक असतो. एखादी व्यक्ती आपला फोटो काढतोय हे लक्षात आल्यावर आपण एकमेकांकडे पाहून हसतो. आपण खऱ्या जीवनातही असे केले तर खूपच कमी घटस्फोट होतील.
ट्विंकलचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खूपच कमी वेळात साडे तीन लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. तुमचे कपल खूपच क्यूट आहे असे त्यांचे चाहते सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
अक्षय कुमार कतरिना कैफसोबत 'सूर्यवंशी' सिनेमात झळकणार आहे. 'सूर्यवंशी' हा चित्रपट २ एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशीच निर्मात्यांची इच्छा होती. त्यासाठी बराच वेळ निर्मांत्यांनी वाट पाहिली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक निर्मांत्यांना सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावा लागला होता. मात्र सुर्यवंशी सिनेमाबाबत असे झाले नाही. त्यामुळे रसिकांना हा सिनेमा पाहायचा असेल तर थिएटरकडे वळावे लागेल. त्यामुळे सिनेमाला लॉकडाऊनंतर किती प्रतिसाद मिळतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.