​ट्विंकल खन्नाला तिच्याच पुस्तकाची विक्री करणारा हॉकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 20:52 IST2016-12-22T20:52:34+5:302016-12-22T20:52:34+5:30

Hawker selling Twinkle Khanna's pirated books bumps into her ; ट्विंकल खन्ना कारमधून प्रवास करताना तिला एक हॉकर तिने लिहलेल्या पुस्तकांची विक्री करताना दिसला. विशेष म्हणजे हा हॉकर स्वत: ट्विंकल जवळ येऊन हे पुस्तक तिने खरेदी करावे यासाठी आला होता

Twinkle Khanna sells his own book! | ​ट्विंकल खन्नाला तिच्याच पुस्तकाची विक्री करणारा हॉकर!

​ट्विंकल खन्नाला तिच्याच पुस्तकाची विक्री करणारा हॉकर!

लिवूडचा खिलाडी अक्षय कुमार व बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार अशी बिरुदावली मिळविणारे राजेश खन्ना यांची मुलगी ट्ंिवकल खन्ना सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सध्या तिने शेअर केलेला एका फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ट्विंकलने लिहलेले पुस्तक एक हॉकर तिलाच विकताना दिसतो आहे. 

अभिनेत्री ते लेखिका असा प्रवास करणारी ट्विंकल खन्ना हिचे ‘मिसेस फनीबोन्स’ हे पुस्तक चांगलेच गाजले होते. बेस्टसेलरच्या यादीत या पुस्तकाचा समावेश करण्यात आला होता. यानंतर नुकतेच ट्विंकलने आपले दुसरे पुस्तक ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ हे प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकासाठी अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग झाली होती. हे पुस्तकही बेस्टसेलर ठरले आहे. ट्विंकलच्या पुस्तकाचा चाहता वर्ग मोठा आहे. शिवाय सर्वच बुक स्टोर्समध्ये तिचे पुस्तक उपलब्ध नाही यामुळे अनेकांना या पुस्तकाची आॅनलाईन खरेदी करावी लागते. असे असताना मात्र एक हॉकर तिचे दोन्ही पुस्तके हातात घेऊन रोडकाठी उभा राहून विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. 

Hawker selling Twinkle Khanna

ट्विंकल खन्ना कारमधून प्रवास करताना तिला एक हॉकर तिने लिहलेल्या पुस्तकांची विक्री करताना दिसला. विशेष म्हणजे हा हॉकर स्वत: ट्विंकल जवळ येऊन हे पुस्तक तिने खरेदी करावे यासाठी आला होता. याचवेळी ट्विंकलेन याचा फोटो काढून सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर शेअर केला. यावर तिने ‘सिलव्हर लाईन आणि शाईची ढगाळ छपाई- हे पायरेटेड आहे की नाही, हे मला बघावे लागेल’ असे कॅप्शन दिले आहे. मात्र ट्विंकलने  लिहिलेल्या पुस्काची विक्री तिलाच करणाºया या हॉकरचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. 

ट्विंकल खन्ना लवकरच चित्रपटात पुनरागमन करणार असल्याचे सांगण्यात येते. ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ या पुस्तकावर चित्रपट निर्माण करावा असे मत ट्विंकलने प्रकाशनसोहळ्या दरम्यान व्यक्त केले होते. आता मात्र या पुस्तकाची कथित पायरेटेड कॉपी आल्याने तिची चिंता वाढली असणार हे नक्की!

">http://

Web Title: Twinkle Khanna sells his own book!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.