लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या मेडिकल टेस्ट का केल्या? अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली- "त्याच्या कुटुंबात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:38 IST2025-10-10T17:35:34+5:302025-10-10T17:38:05+5:30
काय सांगता. लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या तब्बल ५६ मेडिकल टेस्ट करुन घेतल्या होत्या. काय होतं यामागचं कारण

लग्नाआधी ट्विंकलने अक्षयच्या मेडिकल टेस्ट का केल्या? अभिनेत्रीने सांगितलं कारण, म्हणाली- "त्याच्या कुटुंबात..."
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. त्यांच्या नात्यातील प्रेम आणि मिश्किल भांडणं कायमच सर्वांना दिसत असतात. ट्विंकल खन्ना अनेकदा आपल्या खासगी आयुष्यातील मजेशीर किस्से खुलेपणाने सांगते. असाच एक किस्सा तिने नुकताच उघड केला आहे, ज्यात तिने सांगितले की, लग्नापूर्वी तिने अक्षय कुमारच्या मेडिकल टेस्ट केल्या होत्या. काय होतं यामागचं कारण
लग्नापूर्वी ५६ टेस्टची अट
ट्विंकल खन्नाने तिचा पती अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती तपासली होती. ABP ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, ट्विंकलने अक्षयच्या ५ ते ६ नव्हे, तर तब्बल ५६ वेगवेगळ्या टेस्ट केल्या होत्या, जेणेकरून भविष्यात त्यांना किंवा त्यांच्या मुलांना आरोग्याविषयक समस्यांचा सामना करावा लागू नये.
ट्विंकलने तिच्या 'मिसेस फनीबोन्स' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी याबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली, "मला अक्षयसोबत लग्न करायचं होतं आणि मला माहित होतं की, आम्हाला पुढे मुलांना जन्म द्यायचा आहे. त्यामुळे अक्षयच्या संपूर्ण नातेवाईकांची मी यादी बनवली होती."
ट्विंकलने स्पष्ट केले की, तिने अक्षयच्या कुटुंबात कोणत्या प्रकारचे रोग आहेत, कोणाला कोणत्या वयात कोणती समस्या आली होती, याबद्दलची सखोल माहिती गोळा केली होती. जेव्हा अक्षयला ती त्याच्या कुटुंबाबद्दल प्रश्न विचारायची, तेव्हा त्याला वाटायचे की ती त्याची खूप काळजी घेत आहे. पण प्रत्यक्षात ती त्याच्याकडून त्याची संपूर्ण वैद्यकीय माहिती काढून घेत होती.
त्यामुळेच ट्विंकलशी लग्न करण्याआधी अक्षय कुमारसारख्या फिट अभिनेत्याला लग्नापूर्वी अशा 'मेडिकल टेस्ट'च्या अग्निपरीक्षेतून जावं लागलं, हे जाणून चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. पण, ट्विंकल खन्नाने तिच्या मुलांना भविष्यात कोणताही आनुवंशिक आजार होऊ नये, यासाठी उचललेलं हे पाऊल होतं. त्यामुळे सर्वांनी तिच्या भावनांचा आदर केला.