फोटोत दिसणारी ही मुलगी आहे सुपरस्टारची लेक, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री, आई आजही करतेय चित्रपटात काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 16:30 IST2023-07-29T14:55:33+5:302023-07-29T16:30:31+5:30
शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान सोबत तिने चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

फोटोत दिसणारी ही मुलगी आहे सुपरस्टारची लेक, लग्नानंतर सोडली इंडस्ट्री, आई आजही करतेय चित्रपटात काम
फोटोमध्ये दिसणार्या या मुलीने 1995 मध्ये बॉबी देओलसोबत तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. करिअर पहिल्याच चित्रपटापासून ही मुलगी रातोरात स्टार झाली. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिनं ही अभिनयाच्या दुनियेत पदार्पणण केलं. या मुलीचे आई-वडील दोघेही सुपरस्टार आहेत. विशेषत: आई अजूनही चित्रपटांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये काम करते आहे.
आपल्या अभिनय कारकिर्दीत या मुलीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या मुलीने इंडस्ट्रीतील एका बड्या सुपरस्टारशी लग्न केले आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीत तिने शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान यांसारख्या अनेक बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. अभिनयात म्हणवं तसं यश तिला मिळालं नाही. लग्नानंतर तिने फिल्मी जगताला रामराम केला. आता तिने लेखिका म्हणून काम करायला सुरुवात केली. ऐवढ्या हिंटनंतर तुम्हाला या मुलीचं नाव कळलंच असेल. नसेल कळलं तर आम्ही सांगतो.
फोटोत दिसणारी ही निरागस मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ट्विंकल खन्ना आहे. ती ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मोठी मुलगी आहे. हा फोटो पाहून तिला ओळखणं थोडं कठीण जातंय. ट्विंकलने 1995 मध्ये बरसात या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर अभिनयाला रामराम म्हणत तिने लेखनाला सुरुवात केली. अभिनेत्रीची आई डिंपल कपाडिया आजही चित्रपटांमध्ये सशक्त भूमिका साकारत आहेत.
ट्विंकल खन्नाची एकूण संपत्ती सुमारे 250 कोटी रुपये आहे, त्यात अक्षय कुमारच्या कमाईचा किंवा संपत्तीचा समावेश नाही. अभिनयापासून दूर राहूनही ही अभिनेत्री दर महिन्याला 1 कोटी रुपये कमावते आणि वर्षाला 12 कोटींपर्यंत कमावते. ट्विंकल खन्नाने बॉलीवूड तसंच तेलुगू चित्रपटांमध्येही तिचं अभिनय कौशल्य आजमावलं. पण अभिनेत्रींची बहुतांश कमाई ही इंटिरिअरच्या बिझनेसमधून होते. 2001 मध्ये त्यांनी मुंबईत 'द व्हाईट विंडो' हे इंटिरियर डिझायनिंग स्टोअर उघडले. आतापर्यंत तिने कोहली-अनुष्काच्या घराचे इंटीरियर डिझायनिंगही केले आहे.