हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळेच ट्विंकल खन्नाने केले अक्षय कुमारसोबत लग्न, वाचा त्यांची इंटरेस्टिंग प्रेमकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 11:38 AM2020-12-29T11:38:55+5:302020-12-29T11:41:01+5:30

ट्विंकल आणि अक्षय यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. अक्षयसोबत लग्न करण्यासाठी ट्विंकलने त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती.

twinkle khanna birthday Special : twinkle khanna akshay kumar love story | हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळेच ट्विंकल खन्नाने केले अक्षय कुमारसोबत लग्न, वाचा त्यांची इंटरेस्टिंग प्रेमकथा

हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळेच ट्विंकल खन्नाने केले अक्षय कुमारसोबत लग्न, वाचा त्यांची इंटरेस्टिंग प्रेमकथा

googlenewsNext
ठळक मुद्देट्विंकल अक्षयसोबत तिच्या संसारात प्रचंड खूश आहे. ती तिचा सगळा वेळ तिच्या कुटुंबियांना देते. त्यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत.

ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस असून ती सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांची मोठी मुलगी आहे. राजेश खन्ना आणि ट्विंकल यांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो. तिने बरसात या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली. जान, जब प्यार किसीसे होता है, बादशहा यांसारख्या अनेक चित्रपटातील तिच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या. पण मेला हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली आणि तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्न केले. 

ट्विंकल अक्षयसोबत तिच्या संसारात प्रचंड खूश आहे. ती तिचा सगळा वेळ तिच्या कुटुंबियांना देते. त्यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. ट्विंकल आणि अक्षय यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट फिल्मफेअर मासिकाच्या कव्हरपेजच्या फोटो शूटिंगसाठी झाली होती. या फोटोशूटनंतर अक्षयला ट्विंकल आवडायला लागली. त्यानंतर त्या दोघांनी इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांचे अफेअर सुरू झाले आणि काहीच महिन्यात अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले. पण लग्न करण्याआधी ट्विंकलने त्याच्यापुढे एक अट ठेवली होती. ट्विंकलने त्याला सांगितले होते की, माझा लवकरच प्रदर्शित होणारा मेला हा चित्रपट फ्लॉप ठरला तरच मी तुझ्याशी लग्न करेन... हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला आणि त्या दोघांनी ७ जानेवारी २००१ मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायरांच्या घरी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत झाले होते.

करण जोहरच्या कॉफी विथ करण मध्ये ट्विंकलने तिच्या मेला या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. ती या कार्यक्रमात म्हणाली होती की, आजही रसिकांना 'मेला' सिनेमा माझ्या अभिनयामुळे आठवतो, तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. 'मेला' हा सिनेमा २० वर्षांपूर्वी २००० मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये आमिर खानचा भाऊ फैजल खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

Web Title: twinkle khanna birthday Special : twinkle khanna akshay kumar love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.