ट्विंकल खन्नाने केली ग्राहकांची फसवणूक?, कायदेशीर नोटीस बजावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 18:30 IST2018-01-06T13:00:44+5:302018-01-06T18:30:44+5:30

आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणारी अभिनेता अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. ...

Twinkle hacks made fraud of customers, legal notice issued! | ट्विंकल खन्नाने केली ग्राहकांची फसवणूक?, कायदेशीर नोटीस बजावली!

ट्विंकल खन्नाने केली ग्राहकांची फसवणूक?, कायदेशीर नोटीस बजावली!

ामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणारी अभिनेता अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून, ट्विंकलला रीतसर नोटीसही बजावण्यात आली आहे. ट्विंकलवर प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करून त्यांना फसविल्याचा आरोप आहे. याच संदर्भात आता कायदेशीर तक्रार दाखल केल्यामुळे ट्विंकलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विंकलने काही नागरिकांना प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यानुसार सात लोकांनी गुंतवणूक केली. परंतु त्यांना वेळेवर प्रॉपर्टीचा ताबा मिळाला नसल्याने त्यांनी कायदेशीर मदत घेतली. विशेष म्हणजे ट्विंकल केवळ प्रॉपर्टीच्या जाहिरातीतच झळकली नाही, तर तिने फ्लॅट्स घेण्यासाठी ग्राहकांची दिशाभूलही केली. कारण ट्विंकल या प्रोजेक्टची आर्किटेक्चर असून, तिने या फ्लॅटची विक्री करण्याची जबाबदारी घेतली होती, असे तक्रारदारांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्विंकलला आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे. 



अभिनेत्री, लेखक आणि इंटेरिअर डिझायनर असलेली ट्विंकल खन्ना आता ‘पॅडमॅन’च्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटात तिचा पती अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत असून, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथन यांच्यावर आधारित आहे. आतापर्यंत चित्रपटाचे पोस्टर्स आणि ट्रेलर रिलीज झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. 

Web Title: Twinkle hacks made fraud of customers, legal notice issued!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.