वरुण धवनने केले मुलींच्या ‘पिरियड्स’ विषयी ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 17:19 IST2017-03-05T11:48:23+5:302017-03-05T17:19:31+5:30

सध्या वरुण धवन त्याच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमामुळे व करीत असलेल्या भन्नाट ट्विटमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. आता ...

Tweet about Varun Dhawan's 'Girl's Periods' | वरुण धवनने केले मुलींच्या ‘पिरियड्स’ विषयी ट्विट

वरुण धवनने केले मुलींच्या ‘पिरियड्स’ विषयी ट्विट

्या वरुण धवन त्याच्या आगामी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमामुळे व करीत असलेल्या भन्नाट ट्विटमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. आता तर चक्क त्याने मुलींच्या ‘पिरियड्स’ विषयी ट्विट केले आहे. मात्र तुम्ही हे ट्विट वाचाल तर त्याचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. 

‘स्टूडेंट आॅफ द इयर’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणाºया वरुणने ट्विटमध्ये लिहले की, ‘मुलींना पुन्हा शाळेत पाठविण्यासाठी त्यांची मदत करा, मी माझे काम केले आहे, आता तुमची वेळ आहे’ या ट्विटबरोबर त्याने एक फोटोही शेअर केला आहे. त्याने पुढे लिहिले की, ‘भारतात पाच पैकी एका मुलीला पिरियड्समुळे शाळेत जाऊ दिले जात नाही.’ 

Help put a girl child back in school iv done my bit do urs pic.twitter.com/mpXRIBqGx4— Varun Badri Dhawan (@Varun_dvn) March 5, 2017}}}} ">http://

}}}} ">Help put a girl child back in school iv done my bit do urs pic.twitter.com/mpXRIBqGx4— Varun Badri Dhawan (@Varun_dvn) March 5, 2017
वरुणचे हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनले असून, त्याचे सोशल मीडियावर जोरदार अभिनंदन केले जात आहे. त्याचबरोबर त्याचे हे ट्विट मुलींना शाळेत जाण्यापासून रोखणाºयांसाठी एक प्रकारचा संदेशच ठरला आहे. दरम्यान, वरुणच्या या बेधडक ट्विटमुळे नेटिझन्सकडून त्याचे कौतुक केले जात असून, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका अशाप्रकारचा संदेश दिला जात आहे. 

सध्या वरुण त्याच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमामुळे चर्चेत असून, त्याच्या प्रमोशनसाठी तो आलियासोबत प्रत्येक टीव्ही शोमध्ये झळकत आहे. या शोमध्ये दोघेही भरपूर एन्जॉय करीत असून, आपापली गुपितं प्रेक्षकांसमोर उघड करीत आहेत. पण काहीही असो वरुणने मुलींना शाळेत पाठविण्याविषयीचे आपले मत स्पष्ट करून या चळवळीला एकप्रकारे बळकटी दिली आहे, हे मात्र नक्की!

Web Title: Tweet about Varun Dhawan's 'Girl's Periods'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.