'हार्ट अ‍ॅटॅकमुळे सिद्धार्थचा मृत्यु नाही'; राखी सावंतचं धक्कादायक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 15:22 IST2021-09-07T15:21:00+5:302021-09-07T15:22:09+5:30

Rakhi sawant : सिद्धार्थने अचानकपणे घेतलेल्या या एक्झिटचा धक्का सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकांना बसला आहे.

tv rakhi sawant big claims after sidharth shukla death video goes viral on social media | 'हार्ट अ‍ॅटॅकमुळे सिद्धार्थचा मृत्यु नाही'; राखी सावंतचं धक्कादायक विधान

'हार्ट अ‍ॅटॅकमुळे सिद्धार्थचा मृत्यु नाही'; राखी सावंतचं धक्कादायक विधान

ठळक मुद्देसिद्धार्थचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालं नाही. मग नेमकं कशामुळे झालं?

'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन होऊन आज ६ दिवस उलटले. सिद्धार्थने अचानकपणे घेतलेल्या या एक्झिटचा धक्का सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत अनेकांना बसला आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना या दु:खातून सावरणं अशक्य होताना दिसत आहे. आतापर्यंत कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धार्थला आदरांजली वाहिली असून त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्येच राखी सावंतने एक व्हिडीओ शेअर करत धक्कादायक खुलासा केला आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर राखी सावंतने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी तिने सिद्धार्थच्या आईच्या मनस्थितीविषयी माहिती दिली होती. त्यानंतर राखीने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने सिद्धार्थचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्याने झाला नाही, मग नेमका कशामुळे झालाय असा प्रश्न उपस्थित केला आहे.

"आता मी घरात आहे आणि घरातून बाहेर पडणंही मला शक्य होत नाहीये. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे मी पुरती हादरुन गेले आहे. पण आताच मला असं समजतंय की सिद्धार्थचं निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झालं नाही. मग नेमकं कशामुळे झालं? साडे तीन तास वेगवेगळ्या डॉक्टर्सने सिद्धार्थच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. यावेळी मिळालेल्या रिपोर्ट्समध्ये सिद्धार्थचं निधन हार्ट अ‍ॅटॅकमुळे झालंच नाही असं सांगितलं आहे. मग त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. त्याच्या मृत्यूमागचं कारण शोधण्यासाठी आता काही गोष्टींचा तपास सुरु करण्यात येत आहे. मला खरंच या सगळ्याची फार चिंता वाटते", असं राखीने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात
पुढे ती म्हणते, "त्याच्या BMW गाडीच्या काचाही तुटलेल्या होत्या. त्याचं कोणाशी भांडण झालं असेल? असं म्हणतायेत ८ ते ८.३० च्या दरम्यान तो कोणाला तरी भेटायला गेला होता. त्यानंतर घरी आल्यावर बरं वाटत नाही असं आईला म्हणाला. रात्री ३ वाजता त्याला पुन्हा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने काही औषधं घेतली. ती औषधी कोणती होती? बिल्डिंगमध्ये त्याचं भांडण झालं होतं, गाडीच्या काचा फोडल्या होत्या. हे देवा नेमकं सत्य काय आहे?. त्याच्यावर कोणता दबाव होता का?, त्याचं कोणाशी भांडण झालं होतं का?, ती कोणती औषधं होती? हे सगळं समोर आलं पाहिजे. त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे हे सगळ्या चाहत्यांना ऐकायचं आहे आणि हे फक्त डॉक्टरच सांगू शकतात."

'माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत; शाहरुखच्या वक्तव्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
दरम्यान, राखीच्या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आलं आहे. सिद्धार्थचं २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून कूपर रुग्णालयाने त्याच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, राखीच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
 

Web Title: tv rakhi sawant big claims after sidharth shukla death video goes viral on social media