नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:50 PM2021-09-07T12:50:40+5:302021-09-07T12:51:29+5:30

Bobby deol: सेलिब्रिटींच्या आयुष्याशी निगडीत कोणतीही गोष्ट चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी वेगाने व्हायरल होते.

beautiful hot actress living actor bobby deols house leaving husband | नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात

नवरा अन् मुलाला सोडून 'ही' अभिनेत्री राहतीये बॉबी देओलच्या घरात

Next
ठळक मुद्देचित्रांगदाने २००५ साली 'हजारों ख़्वाहिशें ऐसी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

कलाविश्वात दररोज सेलिब्रिटींच्या लव्ह-अफेअर, ब्रेकअप-पॅचअप अशा असंख्य चर्चा रंगत असतात. विशेष म्हणजे सेलिब्रिटींच्या आयुष्याशी निगडीत कोणतीही गोष्ट चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी वेगाने व्हायरल होते. ज्यामुळे ही कलाकार मंडळी कायमच या ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. याच चर्चांमध्ये सध्या अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. ही आपल्या नवऱ्याचं घर सोडून थेट अभिनेता बॉबी देओलच्या घरी राहत असल्याचं म्हटलं जातंय.

अभिनेता अक्षय कुमारचा देसी बॉईज हा चित्रपट आठवतोय का? या चित्रपटात अभिनेत्री चित्रांगदा सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर लोकप्रियतेचं शिखर गाठणारी चित्रांगदा सध्या बॉबी देओलच्या घरात राहत आहे. याविषयी 'नवभारत टाइम्स'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. 

Photos : ओपन शर्टमध्ये मौनी रॉयचं सिजलिंग फोटोशूट 

कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी चित्रांगदा अभिनेता बॉबी देओलच्या घरात भाड्याने राहत आहे. अभिनेता धर्मेंद्र यांनी आर्थिक गुंतवणूक म्हणून अनेक फ्लॅट्स विकत घेतले आहेत. यापैकी काही फ्लॅट्स त्यांनी त्यांच्या मुलांच्या नावावर केले आहेत. यामध्येच बॉबीच्या नावावर असलेल्या घरात चित्रांगदा भाड्याने राहत आहे. चित्रांगदाचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगादेखील आहे.

दरम्यान, राजस्थानमधील जोधपूर येथे जन्मलेल्या चित्रांगदाचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. चित्रांगदाने दिल्लीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं असून तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. २००५ साली 'हज़ारों ख़्वाहिशें ऐसी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
 

Web Title: beautiful hot actress living actor bobby deols house leaving husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app