Photos : ओपन शर्टमध्ये मौनी रॉयचं सिजलिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:41 AM2021-09-07T11:41:51+5:302021-09-07T11:48:44+5:30

Mouni roy sizzling photoshoot : छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आणि 'गोल्ड' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

एकता कपूरच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय.

छोट्या पडद्यावरील 'नागिन' या मालिकेमुळे मौनी घराघरात पोहोचली.

छोटा पडदा गाजवल्यानंतर मौनीने तिचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आणि 'गोल्ड' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

अभिनयासोबतच मौनी तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळेही कायम चर्चेत असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणारी मौनी कायमच इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

अलिकडेच मौनीने एक हॉट फोटोशूट केलं असून यात तिने ओपन शर्टमध्ये पोझ दिली आहे.

मौनीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा शर्ट परिधान केला असून त्याचे काही बटणे ओपन ठेवली आहेत. सोबतच तिने न्यूड मेकअपही केला आहे.

मौनीने 'पती पत्नी और वो', 'दो सहेलिया' आणि 'शsss फिर कोई है' या मालिकांतून अभिनय करत टेलिव्हिजन विश्वात स्वत:चं स्थान निर्माण केलं.

'देवों के देव महादेव' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती.