प्रसिद्ध मॉडेलचा तिच्याच घरात संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:48 IST2019-12-24T16:43:52+5:302019-12-24T16:48:46+5:30
जगीच्या निधनाने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

प्रसिद्ध मॉडेलचा तिच्याच घरात संशयास्पद परिस्थितीत आढळला मृतदेह
जगी जॉनने एक मॉडेल आणि सेलिब्रेटी शेफ म्हणून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक तिला मानले जात होते. पण जगीचा मृतदेह तिच्याच घराच्या किचनमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. जगी केरळमधील कुरवनकोनममध्ये तिच्या आईसोबत राहात होती. जगीज कुकबूक नावाचा तिचा कुकरी शो चांगलाच प्रसिद्ध होता. ती अनेक ब्यूटी आणि पर्सनॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत देखील दिसत असे. जगीच्या निधनाने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
जगी फोन उचलत नसल्याने तिच्या प्रियकराने शेजाऱ्यांना फोन करून तिच्या घरी जाण्यास सांगितले होते. तिचे शेजारी राहाणारे गृहस्थ तिच्या घरात गेले असता त्यांना तिचा मृतदेह आढळून आला. त्यांनीच याबाबत पोलिसांना कळवले. पोलिस सध्या याबाबत चौकशी करत आहेत. जगीच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळून नसल्याचे म्हटले जात आहे. एएनआईने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस सध्या चौकशी करत असून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच ते याविषयी प्रतिक्रिया देऊ शकतील.
जगी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. ती नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असे.