'ही आपल्या देशाची संस्कृती आहे का?'; ब्रालेट घालून फोटोशूट केल्यामुळे मौनी रॉय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 15:05 IST2023-03-16T15:04:34+5:302023-03-16T15:05:31+5:30

Mouni roy: मौनीने मियामीमध्ये ब्रालेट घालून फोटोशूट केलं असून सध्या तिला ट्रोल व्हावं लागत आहे.

tv naagin fame bold actress mouni roy brutally trolled for wear bralette | 'ही आपल्या देशाची संस्कृती आहे का?'; ब्रालेट घालून फोटोशूट केल्यामुळे मौनी रॉय ट्रोल

'ही आपल्या देशाची संस्कृती आहे का?'; ब्रालेट घालून फोटोशूट केल्यामुळे मौनी रॉय ट्रोल

एकता कपूरच्या नागिन या मालिकेतून विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. उत्तम अभिनयापेक्षा मौनी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. अनेक जण तिच्या बोल्डनेसचं कौतुक करतात.परंतु, यावेळी मौनीला तिचा हाच बोल्डनेसपणा महागात पडला आहे. ब्रालेट परिधान करुन विदेशात फिरणाऱ्या मौनीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

सध्या मौनी मियामीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत असून तेथील काही फोटो, व्हिडीओ तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात मौनीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती ब्रालेट परिधान करुन समुद्र किनारी मस्ती करत चालत आहे. परंतु, तिचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर तिचं वागणं पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

काय म्हणाले युजर्स?

'भारतीय मुली दुसऱ्यात देशात गेल्यावर...' अशी कमेंट एकाने केली आहे. तर, 'हे काय कपडे घालून फिरतीयेस',असं एकाने म्हटलं आहे. तर, 'आपल्या देशाची संस्कृती हेच आपल्याला शिकवते का?' असा प्रश्न विचारत अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

Web Title: tv naagin fame bold actress mouni roy brutally trolled for wear bralette