लग्नानंतर वाढला मौनी रॉयचा बोल्डनेस; कडाक्याच्या थंडीत मोनोकिनीत उतरली स्विमिंग पूलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 16:00 IST2022-02-10T16:00:00+5:302022-02-10T16:00:00+5:30
Mouni roy : काही दिवसांपूर्वीच मौनीने प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न केलं असून सध्या ती तिचा हनीमून एन्जॉय करत आहे. या ठिकाणचे अनेक फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

लग्नानंतर वाढला मौनी रॉयचा बोल्डनेस; कडाक्याच्या थंडीत मोनोकिनीत उतरली स्विमिंग पूलमध्ये
छोट्या पडद्यावरील करिअरची सुरुवात करणारी मौनी रॉय ( mouni roy) आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मौनीने अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पाहता पाहता टॉप अॅक्ट्रेसमध्ये हक्काचं स्थान मिळवलं. काही दिवसांपूर्वीच मौनीने प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न केलं असून सध्या ती तिचा हनीमून एन्जॉय करत आहे. या ठिकाणचे अनेक फोटोही ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली मौनी सध्या काश्मीरमध्ये सूरजसोबत हनीमुनसाठी गेली आहे. या हनीमुनमधील अनेक ग्लॅमरस फोटो तिने शेअर केले आहेत. मात्र, यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलं आहे. मौनीने कडाक्याच्या थंडीत चक्क मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे.
मौनीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची मोनीकिनी परिधान केली असून तिने स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
बर्फाच्छदित डोंगरांमध्ये मौनी रॉयने केलं ग्लॅमरस फोटोशूट; भन्नाट पोझमुळे वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष
दरम्यान, मौनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच तिने व्यावसायिक सूरज नांबियारसोबत लग्न केलं आहे. या लग्नाचेही अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.