शूटींग संपवून घरी परतत असताना कारला अपघात, दोन अभिनेत्रींचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 10:31 IST2019-04-18T10:30:38+5:302019-04-18T10:31:53+5:30

शूटींग संपवून घरी परतत असलेल्या दोन तेलगू अभिनेत्रींना अपघातात जीव गमवावा लागला. भार्गवी आणि अनुशा असे या अभिनेत्रींचे नावे आहेत

tv actresses bhargavi and anusha reddy died in road accident | शूटींग संपवून घरी परतत असताना कारला अपघात, दोन अभिनेत्रींचे निधन

शूटींग संपवून घरी परतत असताना कारला अपघात, दोन अभिनेत्रींचे निधन

ठळक मुद्देभार्गवी सध्या ‘मुत्याला मुग्गू’ या मालिकेत   काम करत होती. यात तिचा निगेटीव्ह रोल होता

शूटींग संपवून घरी परतत असलेल्या दोन तेलगू अभिनेत्रींना अपघातात जीव गमवावा लागला. भार्गवी आणि अनुशा असे या अभिनेत्रींचे नावे आहेत. बुधवारी हा अपघात घडला. २० वर्षांची भार्गवी आणि २१ वर्षांची अनुशा रेड्डी या दोघी हैदराबादवरून शूटींग संपवून घरी परतत होत्या. भार्गवी व अनुशाच्या आगामी मालिकेतील काही दृश्यांचे अनंतगिरी येथील  जंगलात चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरण आटोपल्यानंतर या दोघी कारमधून घरी जाण्यासाठी निघाल्या. याचदरम्यान विकाराबाद येथे त्यांच्यावर काळाने झडप घातली.

एक ट्रक त्यांच्या कारसमोर आला आणि अपघात टाळण्याच्या प्रयत्नांत चालकाने कारवरचे नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, भार्गवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अनुशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील अन्य दोघे जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. भार्गवी ही तेलुगू टीव्ही मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री होती. तर अनुशा ही नवोदित अभिनेत्री होती.

भार्गवी सध्या ‘मुत्याला मुग्गू’ या मालिकेत   काम करत होती. यात तिचा निगेटीव्ह रोल होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुशा ही तेलंगणाच्या जयशंकर भुपालापल्ली येथे राहणारी आहे. या दोन्ही अभिनेत्रींच्या निधनावर साऊथ इंडस्ट्रीने शोक व्यक्त केला आहे.
 

Web Title: tv actresses bhargavi and anusha reddy died in road accident

टॅग्स :Accidentअपघात