तुषार कपूर आता वेगळ्या भूमिकेत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 13:27 IST2016-05-16T07:57:49+5:302016-05-16T13:27:49+5:30
अभिनेता तुषार कपूर आणि कॉमेडी सिनेमा असं गेल्या काही वर्षांपासून समीकरणच झालंय. 'गोलमाल' सिरीजमध्ये तर तुषारनं साकारलेली मुक्याची भूमिका ...

तुषार कपूर आता वेगळ्या भूमिकेत ?
अ िनेता तुषार कपूर आणि कॉमेडी सिनेमा असं गेल्या काही वर्षांपासून समीकरणच झालंय. 'गोलमाल' सिरीजमध्ये तर तुषारनं साकारलेली मुक्याची भूमिका रसिकांना भावलीय. मात्र या भूमिका साकारताना तुषार काही वेगळं करताना दिसला नाही. मात्र आता या प्रतिमेला छेद देणारी भूमिका तुषारच्या वाट्याला आलीय. व्ही. शांताराम यांच्या कन्या तसंच पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांच्या पहिल्यावहिल्या 'आईना जिंदगी का' हिंदी सिनेमात तरुणीच्या बालपणीच्या मित्राची भूमिका तुषारच्या वाट्याला आलीय. या भूमिकेबाबत मधुरा जसराज यांचं तुषारशी बोलणं झालं आहे. हा सिनेमा एका बलात्कार पीडित तरुणीच्या जीवनावर आधारित असेल. तुषार यांत या तरुणीच्या बालपणीच्या मित्राच्या भूमिकेत असेल. सिनेमाची स्क्रीप्ट तुषारसमोर मांडली असून तो ही भूमिका स्वीकारेल असं मधुरा जसराज यांनी सांगितलं आहे. त्यातच जितेंद्रजी यांच्याशी घरगुती संबंध असल्यानं तुषार या भूमिकेला होकार देईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.